Type Here to Get Search Results !

घरगुती भांडणातून पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

 


पुणे दि. 0  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स):  घरगुती भांडणातून पतीच्या पतीच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडला. उमाकांत विलास तपताळे (४१. रा ळंदी रोड, भोसरी) यांनी गुरुवारी (दि. ७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार, त्यांची पत्नी स्वाती उमाकांत तपसाळे (वय २५), अभिराम गायकवाड (रा बावडा चौक, इंदापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पत्नी यांच्यात वाद होत असल्याने ते एकत्र राहत नाहीत. दरम्यान २५ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी एमआयडीसीतील फुलेनगर येथून पायी जात होते. यावेळी आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्या अंगावर डिझेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न के.ला याप्रकरणी २६ जून रोजी पिंपरी पोलिस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र पोलिस तपासात घटनास्थळ एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या  हदीत असून आरोपीनी फिर्यादी यांच्या अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले त्यामुळे कम वाढ करीत गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साकार करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.