Headlines
Loading...
जमिनीच्या वादातून भावावर कुर्‍हाडीने वार, अहिरेगावातील घटना; दोघांविरुद्ध FIR

जमिनीच्या वादातून भावावर कुर्‍हाडीने वार, अहिरेगावातील घटना; दोघांविरुद्ध FIR

 पुणे दि. 09  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स):  जमिनीच्या वादातून सख्या भावाला काठीने मारहाण  करून कुन्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न  केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक  केली आहे. सोमदास सखाराम मोकर (वय-55) आणि अविनाश बाळासाहेब पडर (वय 24, दोघे रा. अहिरेगाव ता हवेली) अशी अटक  केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी संजय सखाराम मोकर  (वय 43, रा अहिरेगाव ता हवेली) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. संजय मोकर यांच्यावर दिनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही घटना अहिरेगावातील संजय मोकर यांच्या शेतात बुधवारी रात्री नऊ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय मोकर आणि सोमदास मोकर है सख्ये भाऊ आहेत. त्या दोघांना मिळून 10 एकर जमीन असून ती त्यांच्या आजोबांच्या नावावर आहे, त्यांनी त्याची वाटणी केलेली नसून, तोंडी  वाटणी करून  शेती करत आहेत. सोमदास यांच्या वाट्याच्या जमिनीत सार्वजनिक म्हसोबा मंदिर असून, त्या मंदिरात जाण्याच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून सोमदास हा फिर्यादीला सतत शिवीगाळ व धमकी देत असे. ही बाब फिर्यादी यांनी त्यांचे नातेवाईक गावातील लोकांना सांगितली होती.

फिर्यादी हे 6 जुलै रोजी शेतात काम करीत असताना सोमदास त्या ठिकाणी आला व फिर्यादीला शिवीविगाळ करू लागता. फिर्यादी यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तो समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने ते तेथून निघून गेले. त्रासाला कंटाळून काही लोक जमवून त्याला समजून सांगावे यासाठी फिर्यादी यांनी मुलगा सौभ, भाचा नितेश कंधारे यांना घडलेली माहिती दिली. त्यांना घेऊन रात्री 9 वाजता ते शेतात गेले. सोमदास याला  समजावून सांगण्यास ते गेले तेव्हा अविनाश पडर हाही तेथे होता. सोमदास याला समजून सांगत असताना त्याने सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आज तुला जिवंत ठेवत नाही. असे म्हणून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली फिर्यादी यांना वाचविण्यासाठी मुलगा सौरभ आला. सोमदास याने त्यालाही मारहाण केली. त्याचवेळी तेथे असलेल्या अविनाश पडर हा अचानक हातात कुन्हाड घेऊन आला त्यावेळी सोमदास याने फिर्यादी यांना धरले व अविनाश याने त्यांच्यावर कुन्हाडीचा वार केला तो फिर्यादीने हातावर घेतला. त्यामुळे त्यांच्या डाव्या हातावर गंभीर जखम होऊन ते खाली कोसळले हे पाहून दोघे पळून गेले. फिर्यादी यांच्या मुलाने व भाच्याने त्यांना जखमी अवस्थेत दिनानाथ हॉस्पिटलला दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

0 Comments: