Headlines
Loading...
श्रीकृष्णाचा दाखला देत सायली रमेश वांजळे यांचा कोणाला इशारा ?

श्रीकृष्णाचा दाखला देत सायली रमेश वांजळे यांचा कोणाला इशारा ?

 पुणे दि. 09  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स):  स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या नगरसेविका सायली वांजळे यांची एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली असून, त्यांनी श्रीकृष्णाचा दाखला देत कोणाला इशारा दिला आहे? याबाबत चवीत चर्वण केले जाते आहे.

वाईट प्रवृत्तीची लोकं समजावून सांगून ऐकत असती तर, बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाने महाभारत होऊच दिले नसते, अशा आशयाची हिंदी भाषेतील याद रखना यदि बुरे लोग सिर्फ समझानेसे समझ जाते तो, बासुरी बजाने वाला कभी महाभारत होने नहीं देताअशा आशयाची ती पोस्ट असून, सायली वांजळे यांच्या इंस्टाग्राम, फेसबुकवर स्वत:च्या फोटो सोबत ही कॅप्शन देऊन पोस्ट टाकण्यात आली आहे. त्यामुळे या पोस्ट मध्ये उल्लेख केलेले ते बुरे लोग कोण? श्रीकृष्ण कोण आणि ते महाभारत कोणते?” असा प्रश्न या निमित्ताने चर्चेला आलेला आहे.

पाच वर्ष सातत्याने नागरिकांना सोयी सुविधा पुरवत असताना, सायली वांजळे यांच्यासमोर प्रभागात अनेक आव्हाने उभी राहिली. त्यांच्या विवाह आणि बाळंतपणात प्रभागात संपर्क कमी झाला. या काळात आई हर्षदा वांजळे, चुलते शुक्राचार्य वांजळे, भाऊ मयुरेश वांजळे आणि स्वीय सहायक रवि वांजळे यांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवल्या जात होत्या. विकास कामे होत होती. मात्र कमी पडत होता तो प्रत्यक्ष संपर्क आणि या कमी झालेल्या संपर्काचा गैरफायदा घेत, काहींनी आपल्या राजकीय खेळी खेळल्या होत्या.त्या उलटवण्याचा प्रयत्न करत असताना सायली वांजळे यांनी गेल्या वर्षभरात आपली छबी पुन्हा गडद केली होती. प्रभागातील प्रत्येक घरात भेटीची त्यांची एक फेरी पूर्ण झाली होती. कार्यक्रम, उपक्रमांचा धडाका लागला होता. त्यानंतर आता निवडणूक लांबणीवर पडल्याचा फायदा घेत, गेल्या काही दिवसांमध्ये सायली वांजळे यांनी आपल्या कामाचा वेग वाढवला असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२२ करिता सायली वांजळे सज्ज झाल्याचे दिसते आहे. मात्र त्याचवेळी आलेली त्यांची ही पोस्ट आणखीन चर्चा घडवून जाताना दिसते आहे.

त्यात आणखीन एक विशेष म्हणजे निवडणुका आल्यात आणि टाकण्यात आलेल्या या इंस्टाग्राम पोस्टला अन-स्टॉपेबलचे गाणे लावण्यात आले आहे. त्यामुळे मी आता थांबणार नाही किंवा मला आता थांबवता येणार नाहीअसे तर सायली वांजळे यांना सुचवायचे नाही ना? आपल्याला काय वाटते? कोणाला असेल हा इशारा? कोणत्या महाभारताबद्दल बोलल्या असतील सायली वांजळे? व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्स मध्ये...

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

0 Comments: