Type Here to Get Search Results !

पुण्यात सिंहगड रस्त्यावर दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई



दि. 08  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गेल्या सहा महिन्यात शहरातील २३ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

शिवराज शंकर शिंदे (वय ३४, मूळ रा. उपळाई रोड, बार्शी, सध्या रा. नऱ्हे), मनोज बाळु चांदणे (वय २३) निखील अरुण इंगळे (वय २३, रा. दोघे रा. पानमळा, सिंहगड रस्ता),संजय बाळू चव्हाण (वय २१ रा. धायरी फाटा) अशी कारवाई करणयात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

शिंदे आणि साथीदारांनी सिंहगड रस्ता परिसरात गंभीर गुन्हे केले. शिंदे आणि साथीदारांच्या विरोधात मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी तयार केला. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.या प्रस्तावाची पडताळणी करुन मंजुरी देण्यात आली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.