Type Here to Get Search Results !

शिवणे परिसरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कारवाई

 


दि. 08  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): महापालिकेने नवीन (जॉ कटर) मशिन खरेदी केल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच शिवणे दांगट इस्टेट परिसरातील सर्व्हे क्रमांक ८२ लेन नंबर एकमध्ये नवीन जॉ कटर पोकलेन मशिनच्या साहाय्याने मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धावे दणाणले आहेत. शिवणे दांगट इस्टेट परिसरातील कारवाई करण्यात आली.

या पाच मजली अनधिकृत इमारतीवर पालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये पाच मजली इमारतीचा अर्धवट भाग (जॉ कटर) खेकडा पोकलेन मशिनच्या साहाय्याने पाडण्यात आला. साधारणपणे २० हजार चौरस फुटांचे क्षेत्र कारवाईत मोकळे करण्यात आले. या वेळी बिल्डर व स्थानिकांकडून कारवाईस विरोध केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या विरोधास न जुमानता बांधकाम विकास विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.

सदरील कारवाई बांधकाम विकास विभाग झोन ३ चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, उपअभियंता देवेंद्र पात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन जावळकर, सतीश शिंदे, अजित ववले, संदेश कुळवमोडे यांनी दोन जेसीबी, एक मेकॅनिकल दोन ब्रेकर, अतिक्रमणचे १० कर्मचारी तसेच स्थानिक पोलिसांसह बंदोबस्तातील एकूण ४० पोलिस यांच्या मदतीने केली. शिवणे, उत्तमनगर, वारजे माळवाडी, गणपती माथा, न्यू अहिरेगाव परिसरासह झोन ३ मधील सर्वत्र ठिकाणी आठवड्यातून दोनदा सातत्याने अशीच कारवाई करणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.