Type Here to Get Search Results !

Exclusive: निवडणुका वेळेत पार पाडाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

 


दिल्ली, दि.८ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स): महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारने आपला निर्णय बदलला आहे. नव्याने प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करुन निवडणुका वेळेत पार पाडाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुण्यातील जेष्ठनेते अंकुश काकडे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके, बाबुराव चांदेरे, महेंद्र पठारे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, बुधवारी ते याचिका दाखल करणार आहेत.

काल रविवार दि.७ ऑगस्ट २०२२ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातून बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाईल असा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच हालचाली करत आज सोमवार दि.८ ऑगस्ट २०२२ दुपारीच अंकुश काकडे, प्रशांत जगताप, सचिन दोडके, बाबुराव चांदेरे, महेंद्र पठारे हे दिल्ली मध्ये दाखल झाले असून, त्यांचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर स्वागत केले.

दरम्यान राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांनी वकिलांची देखील भेट घेतली असून, तत्काळ प्रतिज्ञापत्र तयार करून घेत, उद्या मंगळवार दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी मोहरम निमित्त सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असल्याने, परवा बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ सकाळी पहिल्याच सत्रात याचिका दाखल केली जाणार आहे. यामध्ये नव्याने प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करुन निवडणुका वेळेत पार पाडाव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे.

आज दिल्ली मध्ये दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, लक्षद्वीपचे खासदार पी.पी. फैजल मोहम्मद, शिवसेनेचे महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली. तर भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांची देखील या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याची माहिती हाती आली आहे. एकूणच सोमवारी सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.