Type Here to Get Search Results !

उदय सामंत यांचे ओपन चॅलेंज; कात्रज चौकात घेणार जाहीर सभा

 


पुणे दि.  ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत हे विरोधकांना ओपन चॅलेंज देण्याच्या तयारीत असून ते कात्रज चौकातच सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर कात्रज चौकात हल्ला झाल्यानंतर कात्रज चौकातच सामंत यांची जाहीर सभा घेण्याची हालचाल शिंदे गटाकडून सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत सभेची तारीख आणि वेळ शिंदे गटाकडून जाहीर केली जाणार आहे. आमदार उदय सामंत यांनीही सभेला होकार दर्शविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच सभेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. तसेच शहरातील राजकीय ताकद वाढविण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. या सभेच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने येण्याची तसेच या दोन्ही गटातील संघर्षही चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आले असताना माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते. शिवसेना शहर प्रमुखांसह काही पदाधिकाऱ्यांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर हा हल्ला झाल्यामुळे हल्ला पूर्वनियोजित होता असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे या हल्लाला प्रत्युत्तर देण्यासाठीच सामंत यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीची पूर्वतयारी आणि शहरातील शिंदे गटाची राजकीय ताकद वाढविण्यासाठी उद्देशाने उदय सामंत यांची कात्रज चौकात मुख्य सभा घेण्यात येणार आहे. सभेच्या आयोजनासंदर्भात सामंत यांच्याशी चर्चाही झाली असून, लवकरच ही सभा होईल, असा दावा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यानुसार येत्या आठवडाभरात सभा आयोजित होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

 

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.