Type Here to Get Search Results !

पुन्हा लागणार सिकंदर शेख, महेंद्रसिंग गायकवाड यांची लढत; महाराष्ट्र केसरी शिवराजच राहणार?

 

(Wrestlers Sikandar Shaikh and Mahendra Singh Gaikwad will once again wrestle as they are accused of wrongly awarding extra points to Mahendra Gaikwad in the semi-final.)

पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निकालानंतर वादाला तोंड फुटलं होतं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर अन्याय झाल्याच्या भावना अनेक जण सोशल मिडियावर व्यक्त करत आहेत. स्वत: सिकंदर शेखने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली होती. सेमी फायनलच्या लढतीमध्ये चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाड याला जादा गुण दिल्याचा आरोप सध्या होत आहेत. या लढतीत महेंद्रने मारलेला टांग डाव पूर्णपणे बसला नतसाना त्याला चार गुण दिल्याचा आरोप सिकंदर शेख याच्यासह सोशल मीडियावरून होत आहेत.

 

पण या वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड यांच्यात सांगलीत लवकरच मातीतील कुस्ती होणार आहे. विशेष म्हणजे या कुस्तीसाठी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी पुढाकार घेतला आहे.

 

त्यानंतर पंचांना धमकी दिल्याचा प्रकार देखील उघडकीस आला होता. मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांनी पंच मारूती सातव यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप सातव यांनी केला. यावरून कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांच्यावर पुण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. परंतु, सांगलीच्या अंबाबाई तालीम संस्थेने हा वाद मिटवण्यासाठीचा मार्ग शोधून काढला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.