Type Here to Get Search Results !

आम आदमी कडून भाजपा पराभूत; दिल्ली महापालिकेत आप’चेच महापौर, उप-महापौर, स्थायी समिती अध्यक्ष?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): देशाची राजधानी नवी दिल्लीतील (New Delhi) महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक (Election to the post of Mayor and Deputy Mayor) अखेर सुप्रीम कोर्टाच्या (Supre Court) आदेशानंतर पार पडली. महापौरपदी शैली ऑबेरॉय (Shaili Oberoi) यांनी भाजपच्या रेखा गुप्ता (BJP Rekha Gupta) यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत देखील आपनं बाजी मारली. यानंतर स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक सुरु असताना महापालिकेत आप आणि भाजपचे नगरसेवक भिडले. त्यामुळं सभागृहाची कारवाई होऊ शकली नाही. स्थायी समिती निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली असून भाजपकडून ती पुन्हा सुरु करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. (AAP and BJP members continued to clash over the Standing Committee elections and the House was adjourned)

दिल्ली महापालिकेच्या महापौरपदी शैली ऑबेरॉय विजयी झाल्या. त्यांना 150 मतं मिळाली तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना 116 मतं मिळाली. यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक देखील शांततेत पार पडली. मात्र स्थायी समितीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. या वादामुळं दिल्ली महापालिकेचं सभागृह रात्रभर कधी एक तास तर कधी अर्धा तास स्थगित करण्यात आलं होतं.

स्थायी समितीच्या निवडणुकीतील वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. या वादानंतर भाजप आणि आपच्या नगरसेवकांनी एकमेकांवर बाटल्या फेकल्या. दोन्ही बाजूच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्कीसह मारामारी देखील झाली. मतपत्रिकेचा बॉक्स देखील वेलमध्ये फेकण्यात आला होता. बाटल्या फेकण्यास सुरुवात होताच काही नगरसेवक सभागृहाच्या बाहेर गेले तर काही जण टेबलाखाली लपून बसले.

आपच्या नेत्या अतिषी त्यांच्या नगरसेवकांना समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र दोन्ही बाजूचे नगरेसवक आक्रमक झाले होते. या सगळ्या वादामुळं स्थायी समितीच्य सदस्यांची निवडणूक पार पडलेली नाही. स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी पाच नगरसेवकांना बोलवून मतदान करुन घेतलं जात होतं. पाच नगरसेवकांना मतदानासाठी बोलावलं त्यांना मतपत्रिका देण्यात आली मात्र, त्यांनी मतपत्रिका देण्यास नकार दिला.

महापौरांनी मतपत्रिका देण्याची मागणी करुन देखील मतपत्रिका नगसेवकांनी दिली नाही. त्यानंतर वादाला सुरुवात झाली. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी दिल्ली महापालिकेत घडलेला प्रकार धक्कादायक असल्याचं म्हटलंय. आपचे आमदार सौरभ भारद्वाज (AAP MLA Saurabh Bhardwaj) यांनी भाजप स्थायी समितीची निवडणूक होऊ देत नसल्याचा आरोप केला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.