Type Here to Get Search Results !

उत्तमनगर मध्ये ५ वर्षांच्या मुलीचा आईने केला खून; फिट येऊन बेशुद्ध पडल्याचा केला बहाणा

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times

पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) हद्दीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 5 वर्षांच्या मुलीला चटके देऊन, डोक्यात कठीण वस्तूचा प्रहार करत, आईनेच खून केला असलेबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये नराधम आई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune crime news)


याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्वेता राजेश आनंद (Shweta Rajesh Anand) (वय 5 वर्षे रा. धावडे बिल्डींगमनिषा टॉकीज जवळअहिरेगेटउत्तमनगरशिवणे, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. तर रितीका सुनिल बक्षी ऊर्फ रितीका पुतीन नाग ऊर्फ रितीका राजेश आनंद (वय 36 रा. धावडे बिल्डींगमनिषा टॉकीज जवळअहिरेगेटउत्तमनगरशिवणे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. तर उत्तमनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आनंद रोहिदास घोलप (Police Constable Anand Rohidas Gholap) यांनी फिर्याद दिली आहे. 

यातील मयत श्वेता राजेश आनंद हिला फिटचा त्रास होता व फिटमुळे ती बेशुध्द झाली असून, तीला गुरुवार दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी एकच्या सुमारास ससुन हॉस्पीटल (Sasoon Hospital) येथे उपचार कामी नेले असता, तीला डॉक्टरांनी तपासुन उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषीत केले होते. यावेळी 2 पंचासमक्ष केलेल्या इन्कवेस्ट पंचनाम्यात उत्तमनगर पोलिसांना मयत मुलगी श्वेता हिच्या शरीरावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात काळे निळे ताज्या मारहाणीच्या खुणा (beating marks) व भाजलेल्या खुणा (Burn marks) दिसत होत्या.

यावरून या घटनेत फिट नसून, मुलीचा खून झाला असल्याची शक्यता गृहीत धरत, ससून रुग्णालयात गेलेल्या उत्तमनगर पोलिसांनी, उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर यांना तत्काळ कळवून, त्याच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ शवविच्छेदन अहवाल मागवला. या अहवालानुसार डोक्यात आणि शरीरावर अनेक ठिकाणी झालेल्या मारहाणीमुळे सदरील मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यावेळी उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने मयत श्वेताची आई रितिका हिला जराही संशय येऊ न देता, तिला उत्तमनगर पोलीस स्टेशनला आणून, विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने दिलेली माहिती धक्कादायक होती. (pune crime news) 

रितिका हिने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार, मयत मुलीची रितीका ही सावत्र आई आहे. तिने मागील 2 ते 3 दिवसापासुन श्वेता हिस शरीरावर चटके देवून मारहाण केली होती. तर गुरुवार दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 ते 10 च्या सुमारास कठीण वस्तुने डोक्यात मारुन तिचा खून केला. यानंतर श्वेताला फिट आली असे भासवून तिनेच श्वेताला दवाखान्यात नेले. उत्तमनगर पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तिचे हे नाटक उघडे पडले. तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Senior Police Inspector Sunil Jaitapurkar) पुढील तपास करत आहेत. 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.