Type Here to Get Search Results !

मालकाची बायको लफडयात पळीवली; तिला काही महिन्यातच संपवली


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 18 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून आणि गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न (attempt to suicide) केला. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी पळून जाऊन आळंदी येथे प्रेम विवाह (love marriage) केला होता. अक्षयवर सध्या ससून रुग्णालयात (sasun hospital) उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (pune crime news)

ही घटना 15 ते 16 फेब्रुवारी दरम्यान फुरसुंगी (fursungi) येथील खंडोबा माळमध्ये (khandoba mal) घडली. याप्रकरणी स्वातीच्या 39 वर्षीय वडिलांनी फिर्याद दिली असून हडपसर पोलिसांनी अक्षय आनंदा जाधव (Akshay Ananda Jadhav) (वय 25) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. स्वाती अक्षय जाधव (Swati Akshay Jadhav) (वय 22, रा. साई पॅराडाईज हौसिंग सोसायटी, खंडोबा माळ फुरसुंगी गाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. (fursungi murder case)

मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती यांचा पूर्वी नगर जिल्ह्यातील एका व्यक्तीसोबत विवाह झाला होता. अक्षय हा तिच्या पहिल्या पतीकडे जेसीबीवर चालक म्हणून काम करत होता. तेथे दोघांचे प्रेम जुळले. त्यातून स्वातीने घटस्फोट न घेताच अक्षयशी आळंदी (alandi) येथे प्रेमविवाह केला. दोन ते अडीच महिन्यापूर्वी दोघे खंडोबा माळ फुरसुंगी गाव परिसरात राहायला आले होते.

गुरुवारी (दि. 18 फेब्रुवारी 2023) पहाटेच्या सुमारास त्याने स्वातीचा डोके भिंतींवर आदळून आणि गळा दाबून खून (murder) केला. त्यानंतर स्वतः विष प्राशन केले व नातेवाइकांना फोन करून स्वातीचा खून केल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच नातेवाइकांनी अक्षयच्या भावाला याबाबतची माहिती दिली. त्याने पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून हा प्रकार कळविला.

त्यानुसार पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (Deputy Commissioner of Police Vikrant Deshmukh), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule) आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे (Sub-Inspector of Police Sushil Damre) करीत आहेत.

“अक्षय हा स्वाती यांच्या पहिल्या पतीकडे जेसीबी चालक म्हणून काम करीत होता. तेथे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. स्वातीचा खून केल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो शुद्धीवर आल्यानंतर खुनाचे नेमके कारण समजू शकेल.” असे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.