Type Here to Get Search Results !

मोबाईल पहाताना रागावली आई; मुलाने गळा दाबून केला तिचा खून

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 18 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): अभ्यास करताना मोबाईल पहात असलेल्या मुलाला रागवल्याच्या कारणातून 12 वीत शिकणार्‍या एका मुलाने आईला भिंतीवर ढकलून दिले. त्यानंतर तीचा गळा दाबून खून केला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल लक्ष्मणराव घोडके (Sub-Inspector of Police Amol Laxmanrao Ghodke) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (loni kalbhor police station) फिर्याद दिली आहे. (pune crime news)

तस्लीम जमीर शेख (Taslim Zameer Sheikh) (वय 37, रा. उरुळीकांचन) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) संशयित आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना उरुळी कांचन (Urali Kanchan) येथील माऊली कृपा इमारतीत 15 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3:30 वाजता घडला. हा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन परिसरात घडला आहे.

जमीर शेख (Zameer Sheikh) हे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती. मुलगा हा 12 वीत आहे. तो अभ्यास करीत असताना मोबाईलवर पहात बसला होता. ते पाहून त्याची आई तस्लीम चिडली आणि त्याच्यावर रागवली. त्याच्या गालावर चापट मारली. त्यामुळे मुलाने आपल्या आईला जोरात भिंतीवर ढकलुन तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यु झाला. आई निपचित पडल्याचे पाहून तो घाबरला. त्याने ब्लेडने तिचे मनगट कापले. परंतु, मृत्यु झाला असल्याने त्यातून रक्त आले नाही. त्याने वायर फॅनला अडकविली. खाली आईचा मृतदेह ठेवला. काही वेळाने जमीर शेख आल्यावर आईने गळफास घेतला. (pune crime news)

त्यानंतर तिला खाली उतरवून जवळच्या रुग्णालयात नेले. मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. डॉक्टरांना संशय आल्याने तेथे तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले. त्यात गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यु झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.

याबाबत घरातील कोणीही फिर्याद देण्यास तयार नसल्याने पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक काळे (Police Inspector Kale) तपास करीत आहेत.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior Police Inspector Dattatraya Chavan) यांनी सांगितले की,”डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा नेमकी माहिती देण्यास कोणीही तयार नव्हते. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. ही घटना घडली तेव्हा वडिल जमीर आणि मुलगा जिशान हे दोघेच तेथे होते. त्यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केल्यावर मुलाने घडलेली घटना सांगितली.” (pune crime news)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.