Type Here to Get Search Results !

आणखी एका बँकेत बनावट सोने तारण घोटाळा; 69 लाख रुपयांची फसवणूक केलेप्रकरणी 32 जणांवर गुन्हा दाखल

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नगर अर्बन (Nagar urban), नगर शहर सहकारी बँक (Nagar shahar sahakari bank) यापाठोपाठ जिह्यातील आणखी एका बँकेत बनावट सोनेतारण घोटाळा समोर आला आहे. तब्बल 32 आरोपींनी संगनमत करून संगमनेर (sangamner) शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा (Maharashtra Gramin Bank) विश्वासघात करत सुमारे 69 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Bank Gold Loan Scam)

संगमनेर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सोनेतारण करताना आरोपींनी बनावट सोने गहाण ठेवत त्या बदल्यात तब्बल 68 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज (loan) उचलले आहे. बँकेच्या लेखापरीक्षणामध्ये (Audit) बनावट सोन्याची काही पाकिटे सापडल्याने ही खाती बनावट (Fake accounts) असल्याचे तपासणीमध्ये समोर आले. या बनावट खात्याच्या माध्यमातून 68 लाख 94 हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला होता. या कर्जाची थकबाकी (Debt arrears) जानेवारीपर्यंत 72 लाख 82 हजार 652 रुपयांवर गेली आहे.

बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर जगदीश शहाणे यांनी या सोन्याची पडताळणी केली होती. त्यांनीच पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप आहे. बँकेचे शाखा व्यवस्थापक नंदकिशोर नामदेव म्हस्के (Bank Branch Manager Nandkishore Namdev Mhaske) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये (Sangamner Police Station) गोल्ड व्हॅल्युअर जगदीश शहाणे याच्यासह तब्बल 32 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 जुलै 2020 ते 13 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यातील बराच काळ देशभरात कोरोना कहर सुरू होता. याचाच आरोपींनी फायदा घेतल्याचे दिसते.

संगमनेर (Sangamner), अकोले (Akole), राहाता (Rahata) येथील तब्बल 32 जणांचा आरोपींमध्ये समावेश असल्याने बँकिंग क्षेत्रात (Banking sector) व ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. बँकेने 18 जानेवारी 2023 रोजी बँकेकडील सोन्याचे ऑडिट आणि सोन्याच्या दागिन्याचे पुनर्मूल्यांकन केले. पुनर्मूल्यांकनाच्या उद्देशाने बँकेने संगमनेर शाखेच्या तीनही पॅनल केलेल्या सुवर्णमूल्यधारकांना आमंत्रित केले होते. यावेळी केलेल्या सोनेतपासणी ऑडिटमध्ये काही बनावट सोन्याची पाकिटे सापडली. सहायक पोलीस निरीक्षक निवांत जाधव तपास करत आहेत.

गोल्ड व्हॅल्युअर जगदीश शहाणे (रा. संगमनेर), रवींद्र रमेश राजगुरू, सविता दीपक जाधव (दोघे रा. मालदाड रोड), दीपक दत्तात्रय जाधव (रा. महात्मा फुलेनगर), संदीप नंदू कलांगे (रा. पोफळे मळा), आयुब उस्मान पठाण (रा. लखमीपुरा), नानासाहेब भागवत राऊत, कैलास रामनाथ शिरसाठ, वैभव प्रकाश वाकचौरे, कृष्णा भाऊसाहेब गाढवे, पुष्पा राजेश पवार, जगदीश सुभाष म्हसे, सुधीर रावसाहेब घुगे, प्रकाश मारुती तुपसुंदर (सर्व रा. घुलेवाडी), स्वप्नील भास्कर पगार (रा. चिंचोली गुरव), संजय बद्रीदास बैरागी (रा. संगमनेर), विजय भास्कर अवचिते (रा. पावबाकी रोड), प्रतीक नानासाहेब केरे (रा. निळवंडे), ताराबाई रावजी घुगे (रा. संगमनेर), मारुती अण्णासाहेब मंडलिक (रा. रायतेवाडी फाटा), राहुल शिवाजी गायकवाड (रा. घोडेकर मळा), प्रसाद संजय वरपे (रा. वरवंडी), लखन शांताराम कडलग (रा. वडगाव पान), मच्छिंद्र एकनाथ मंडलिक (रा. जनतानगर), सागर गोरक्ष अवचिते (रा. शिबलापूर-मालुंजे), प्रदीप विठ्ठल गाडेकर (रा. डिग्रज रोड, मालुंजे), अमृतराज किसन वाघमारे (रा. खराडी वाघापूर), संदीप पंढरीनाथ घुगे (रा. शेडगाव रोड, मालुंजे), दत्तू खंडू साळवे (रा. पिंपरणे रोड, अंभोरे), गणेश भाऊसाहेब अवचिते (रा. शिबलापूर रोड, मालुंजे, ता. संगमनेर), विशाल अनिल उगले (रा. डोंगरगाव, ता. अकोले), कोमल राजेंद्र जगधने (रा. वाकडी, ता. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.