Type Here to Get Search Results !

धनकवडी, दत्तनगर, वंडर सिटी वाहतूक कोंडीच्या विळख्यात; नागरिकांची बोंबाबोंब

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत कात्रज (Katraj) परिसरत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामामुळे त्रिमूर्ती चौकाकडून राजमाता भुयारी मार्गाकडे जाणारा रस्ता अर्धवट खोदून ठेवल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

भारती विद्यापीठ भागातील त्रिमूर्ती चौकाकडून दत्तनगरकडे जाणार्‍या रस्त्यावरील राजमाता भुयारी मार्गाच्या परिसरात वंडर सिटीशेजारी पंपिंग स्टेशनची जलवाहिनी टाकण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हे काम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. कात्रज-देहू रस्ता राष्ट्रीय महामार्गावरून या ठिकाणी सर्विस रस्ता व भुयारी मार्ग असल्याने या कामामुळे सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याकडे महापालिकाचे दुर्लक्ष होत आहे.

या ठिकाणी खोदकामात गेल्या काही दिवसांपूर्वी गॅस पाइप लाइनही फुटली होती. पंपिंग स्टेशनपासून वडगाव पंपिंग स्टेशनकडे जलवाहिनी टाकण्यासाठी जेसीबीद्वारे हा रस्ता खोदण्यात आला. या ठिकाणी पाणीगळती होऊन रस्ता चिखल झाल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे.

परिणामी, पादचारी व वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे तसेच दुभाजकामधील दगड अस्ताव्यस्त पडले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काम झाल्यानंतर खोदलेल्या खड्ड्यामध्ये दगड, गोटे व माती टाकण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

याबाबत माय कंट्री माय पीपल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण भोसले म्हणाले कि,”रहदारीच्या मुख्य रस्त्यावर समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई केली. मात्र, ते रस्तादुरुस्तीचे काम तातडीने काम करण्यात आले नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.”

तर महापालिकेचे पथ विभाग उपअभियंता दिलीप पांडकर म्हणाले कि,”समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत प्रकल्पाचे काम सुरू आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई सुरू आहे. पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाल्याची खातरजमा करून रस्तादुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.