Type Here to Get Search Results !

तरुणीला पळवून नेल्याच्या संशयावरून त्या तरुणाच्या बहिणीचे अपहरण करुन केली मारहाण; विवस्त्र करुन व्हिडीओ केला सोशल मीडियावर व्हायरल

 

पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): तरुणीला पळवून नेल्याच्या संशयावरून आरोपींनी त्या तरुणाच्या 24 वर्षीय बहिणीचे अपहरण (kidnapping) करुन दोन दिवस खोलीत डांबून मारहाण केली. तसेच, तिला विवस्त्र (naked) करुन तो व्हिडीओ सोशल मीडियावर (posted on social media) प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडित तरुणीच्या बहिणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (loni kalbhor police station) फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार माटे (nandkumar mate), सुंदराबाई माटे (sundarabai mate), आरती पिंपळे (aarati pimpale), बाळासाहेब पिंपळे (balasaheb pimpale), सागर जगताप (sagar jagtap), श्रीराम गोसावी (shriram gosavi) (सर्व रा. उरळी कांचन, पुणे- सोलापूर रस्ता) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयिताची नावे आहेत. हा प्रकार 26 जानेवारी ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत दत्तवाडी (dattawadi) आणि उरळी कांचन (urali kanchan) परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या भावाने आरोपीच्या मुलीला पळवून नेल्याचा संशय आहे. परंतु त्याच्या बहिणीने भावाचा ठावठिकाणा सांगितला नाही. त्यामुळे आरोपींनी चिडून या तरुणीचे रिक्षातून अपहरण केले. सळइने मारहाण करून एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर तिला विवस्त्र करून चित्रीकरण करून सोशल मीडियावर (social media) प्रसारित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.