Type Here to Get Search Results !

अंडाभुर्जी हातगाडी चालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी एक जण गजाआड

पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): एकाच दिवसात विमानतळ पोलीस ठाण्यात (Airport Police Station) खंडणीखोरी करणाऱ्यांवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar) यांनी माथाडीच्या नावाखाली खंडणी (Extortion) उकळणार्‍यांना इशारा दिल्यानंतर हे तीन गुन्हे दाखल खंडणीखोरांना विमानतळ पोलिसांनी दणका दिला आहे. (pune crime news)

पहिल्या प्रकरणात अंडाभुर्जीची हातगाडी लावण्यासाठी दरमहा 10 हजार रुपयांच्या हप्त्यांची मागणी करणाऱ्या अशोक चव्हाण (वय 45, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 35 वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे पती म्हाडा कॉलनीच्या बसस्टॉपजवळ (mhada colony bustop) अंडाभुर्जीची हातगाडी लावतात. अशोक चव्हाण हा 31 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता तेथे गाडीवर आला. फिर्यादी यांना अंडाभुर्जीची गाडी चालू ठेवण्यासाठी दरमहा 10 हजार रुपयांची हप्त्याची मागणी केली. हप्ता न दिल्यामुळे त्याने फिर्यादींना अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन हाताने चापट मारली. तसेच पतीला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. (pune marathi news)

दुसऱ्या प्रकरणात ट्रकमधून माल घेऊन आलेल्यांना अडवून माथाडी संघटनेला 500 रुपये एंट्री द्यावी लागेल, अशी मागणी करणाऱ्या धोंडिबा विठ्ठल राखपसरे (dhondiba vitthal rakhpasare) (रा. राखपसरे वस्ती), राहुल भिमराव त्रिभुवन (Rahul bhimrao tribhuvan) (रा. संजय पार्क,विमाननगर) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लोहगाव (lohagaon) येथील सरस्वती एंटरप्रायजेस (saraswati enterprises) येथे 24 जानेवारी 2023 रोजी झाला होता.

एका बिल्डिंग सप्लायर व्यावसायिकाने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद (complaint) दिली आहे. त्यांच्या कंपनीचा चालक व इतर तीन कामगार हे डिस्ट्रीब्युटरकडे माल पोहचविण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा ट्रक अडविला. माल खाली करण्यासाठी माथाडी संघटनेला 500 रुपये एंट्री द्यावी लागेल नाही तर तुम्हाला बघून घेईल, अशी धमकी दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

तिसऱ्या माथाडी संबधीत प्रकरणात 36 वर्षाच्या व्यावसायिकाने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रवी ससाणे व त्यांच्या तीन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिनिक्स मॉल (phoenix mall) येथे 19 ऑक्टोबर 2022 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची फर्म असून त्यांना एका कंपनीचे फ्लोअरींगचे (flooring) फरशी बसविण्याचे काम मिळाले आहे. त्यासाठी कोची (kochi) येथून फरशा घेऊन ट्रक 19 ऑक्टोबर 2022 रोजी आला होता. रवी ससाणे (Ravi Sasane) व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी ट्रकमधील माल खाली करण्यास हरकत घेतली.

रवी ससाणे फिर्यादीला म्हणाला, मी येथील स्थानिक आहे. ट्रकमधील फरशी आम्हीच खाली करणार, त्यासाठी तुला 5 लाख रुपये द्यावे लागतील, असे बोलला. त्यावर त्यांनी तुम्ही माथाडी बोर्डाचे नोंदणीकृत कामगार आहात का, असे विचारले. तेव्हा ससाणे याने माझी तू माहिती काढून बघ, मी तडीपार होतो, तुला या ठिकाणी गाड्या लोडिंग (loading) आणि अनलोडिंग (unloading) करायच्या असतील तर मला 5 लाख रुपये देऊन टाक. नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यावर फिर्यादी यांनी त्यांच्याजवळ असलेले 76 हजार रुपये दिले. त्यानंतर ते फरशा खाली न करता तसेच निघून गेले.

दुसऱ्या दिवशी त्याचे साथीदार येऊन फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने 1 लाख 24 हजार रुपये घेऊन गेले. फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात 29 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर 23 जानेवारी 23 रोजी त्यांचा ट्रक ससाणे याच्या लोकांनी पुन्हा अडविला. तुम्ही रवी मामाला ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत, असे म्हणून ट्रक खाली करण्यास हरकत घेतली. तेव्हा फिर्यादी यांनी घरातून 112 क्रमांकावर फोन केला. पोलीस आल्याचे पाहून रवी सासणे ची माणसे निघून गेली. त्यानंतर आता खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Squad) या घटनेची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.