Type Here to Get Search Results !

नव्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या या गावांची वेगळी नगरपरीषद करण्यात यावी; कृती समितीची मागणी

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेमध्ये (pune mahanagar paliika) शिवणे (shivane) आणि उत्तमनगर (uttamnagar) पाठोपाठ नव्याने समाविष्ठ झालेल्या कोंढवे धावडे (kondhve dhawade) आणि न्यु कोपरे (new kopre) या गावातील ग्रामस्थांनी शिवणे कोंढवे-धावडे उत्तमनगर न्यु-कोपरे सजग ग्रामस्थ कृती समिती स्थापन करून, आता पुणे महानगरपालिकेतून वगळण्याची मागणी (Demand for exclusion from Pune Municipal Corporation) केली आहे. तर या चार गावांची वेगळी नगरपरिषद करण्यात यावी असाही सूर समोर येत आहे. तर मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाची तयारी करा अशी मागणी देखील कृती समिती सदस्यांनी केली आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 ला समाविष्ठ करण्यात आलेल्या शिवणे आणि उत्तमनगर, त्यापाठोपाठ 2021 मध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या कोंढवे धावडे आणि न्यू कोपरे गावांना पुणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे कर आकारणी सुरु झाली आहे. या कर आकारणी वरून सुरुवातीलाच मोठा वादंग निर्माण झाला. या गावांना लावण्यात आलेला कर कमी करावा या मागणीसाठी महानगरपालिकेचे आयुक्त (Municipal Commissioner), तत्कालीन महापौर (pune Mayor), तत्कालीन महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi), तत्कालीन पालकमंत्र्यापासून (Guardian Minister - palakmantri) सर्वांकडे या गावांनी दाद मागितली. मात्र हातात ठोस काहीही आले नाही.

याची परिणीती आता या चारही गावांची मिळून एक कृती समिती तयार झाली असून, सदर ठिकाणच्या मिळकतदारांची बैठक (meeting) झाली. सदर बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेला विरोध दर्शवण्यात आला व पुणे महापालिकेचे कर आकारणी धोरण निश्चित होईपर्यंत कोणीही कर भरू नयेत असे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर फुरसुंगी (fursungi) व देवाची उरुळी (uruli devachi) या गावांप्रमाणेच या चारही गावांची लोकसंख्या (population) एक लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे या गावांची वेगळी नगरपरीषद (separate Municipal Council) करण्यात यावी व पुणे महापालिकेच्या जाचक व अन्यायकारक अशा टॅक्सच्या आकारणीतून नागरिकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी सर्वांच्या वतीने एकमुखाने करण्यात आली.

या बैठकीस चारही गावांचे बहुसंख्य त्रस्त नागरिक, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तर कृती समितीच्या मागण्या मान्य न झाल्यास, प्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या विरोधात मोठे आंदोलन (strike) उभे करण्यात यावे, अशीही मागणी काही ग्रामस्थांनी बैठकीत केली. त्यामुळे आगामी काळात या मागण्यांसाठी आंदोलन उभे राहिल्यास नवल वाटायला नको.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.