Type Here to Get Search Results !

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित भोसरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ५५ श्रद्धाळूंनी केले रक्तदान...

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज (sadguru mata sudikshaji maharaj) यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच सुतारवाडी (Sutarwadi) येथे संत निरंकारी मिशन (Nirankari Mission) ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp) आयोजन 12 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये 55 श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, यामध्ये संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी 55 युनिट रक्त संकलन केले. (Pune Blood Donation Camp)

या शिबिराचे उदघाटन आदरणीय मृणाल निम्हण (Mrunal Nimhan) (पायलट) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला प्रमोद निम्हण (Pramod Chavhan) (मा. नगरसेवक), सनी निम्हण (Sunny Nimhan) (मा. नगरसेवक), सचिन पाषाणकर (Sachin Pashankar) (मा. नगरसेवक), शिवम सुतार (Shivam Sutar) (मा. नगरसेवक) तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर 1986 मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज (inauguration by aavahan यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील 36 वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत 7474 रक्तदान शिबीर संपन्न झाली असून 12,32,419 युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि 'रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे'. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

संत निरंकारी मिशन (Sant nirankari mission) द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे  उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार प्रमुख बिगबहादूर बोगाटी (Bigbahadur Bogati) यांनी केले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.