Type Here to Get Search Results !

राजगडावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा बालेकिल्ल्याच्या पायथ्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,

 

पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): किल्ले राजगड (ता. वेल्हे) (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा बालेकिल्ल्याच्या (rajgad balekilla) पायथ्याला हृदयविकाराच्या (heart attack) झटक्याने मृत्यू झाला. ही घटना काल (ता. 12 फेब्रुवारी 2023) दुपारी 12 च्या सुमारास घडली. (pune news)

पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या तरुणास वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु ते असफल ठरले. दीपक दिनकरराव सुकळीकर (Deepak Dinkarrao Suklikar) (वय 35, रा. भुकूम, ता. मुळशी) असे तरुणाचे नाव आहे.

घटनेबाबतची माहिती राजगड किल्ल्याचे पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे (Bapu Sable, the staff of the Archaeological Department of Rajgad Fort) यांनी दिली. ते म्हणाले,"रविवार असल्यामुळे पर्यटकांची किल्ल्यावर मोठी गर्दी होती. त्यापैकी एका ग्रुपमधील सदस्य सुकळीकर हे बालेकिल्ला उतरताना चक्कर येऊन बेशुद्ध पडले. याची माहिती मिळताच घटनास्थळी पुरातत्त्व विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. कर्मचारी विशाल पिलावरे (Vishal Pilawre), आकाश कचरे (Akash Kachare), दीपक पिलावरे आदींनी उपस्थित पर्यटकांच्या मदतीने दीपक यास बालेकिल्ल्यापासून स्ट्रेचरच्या (stretcher) सहाय्याने खंडोबा माळ (Khandoba Mal) येथे मोठ्या जिकरीने खाली आणण्यात आले."

पुढे त्यांनी सांगितले कि,”108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क केल्यामुळे रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल बोरसे (Ambulance Medical Officer Dr. Rahul Borse) व चालक तुषार येनपुरे (Driver Tushar Yenpure) यांनी बेशुद्ध तरुणावर प्राथमिक उपचार केले. परंतु त्यास प्रतिसाद देत नसल्याने दीपक यांना तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल केले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत भोईटे (Dr. Chandrakant Bhoite) यांनी दीपक हे उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले.”

दरम्यान, किल्ले राजगड व तोरणा गडावर पुरातत्त्व विभागाने प्राथमिक उपचाराच्या साहित्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी दुर्गप्रेमी व शिवशंभू प्रतिष्ठान कात्रजचे अध्यक्ष महेश कदम (Shivshambhu Pratishthan Katraj President Mahesh Kadam) यांनी केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.