Type Here to Get Search Results !

शेवटी फडणवीसांना “मनसे=मतदार नसलेली सेना” आणि “उनसे= उमेदवार नसलेली सेना” चा आधार घ्यावा लागला?

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (pune kasba and chinchwad by-election) मनसेने (MNS) आपला पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारांना दिला आहे. प्रचारात सक्रिय सहभाग घेणार नाही, परंतु कार्यकर्ते पदाधिकारी भाजपला मदत करतील, असं मनसेकडून जाहीर केलं गेलं आहे. मनसेच्या भूमिकेचं भाजप नेत्यांनीही स्वागत केलं आहे. मात्र ज्या मनसे प्रमुखांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हिणवलं, मतदार नसलेली सेना, उमेदवार नसलेली सेना म्हणून मनसेला डिवचलं, त्या मनसेचा पाठिंबा फडणवीसांनी कसा काय घेतला? अशी कुजबूज सध्या पुण्यात नाक्या-नाक्यावर ऐकायला मिळतीये. (Pune News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. या भेटीत त्यांनी कर्करोगाशी (Cancer) लढा देणाऱ्या खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांची भेट घेतली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. गिरीश बापट यांनी आजारपणामुळे कसब्याच्या प्रचारातून माघार घेतल्याने भारतीय जनता पक्ष काहीसा संकटात सापडला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक फारच चुरशीची होणार आहे. त्याचदृष्टीने आज फडणवीसांनी बापटांशी विस्ताराने चर्चा केली.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Congress candidate Ravindra Dhangekar) यांना राष्ट्रवादी (rashtra wadi), शिवसेना ठाकरे गट या दोन मोठ्या पक्षांसह विविध घटक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (BJP candidate Hemant Rasane) यांना शिंदे गटासोबत अनेक छोट्या मोठ्या घटक पक्षांचा पाठिंबा आहे. महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी (दि. 14 फेब्रुवारी 2023) रात्री उशिरा मनसेने भाजप उमेदवारांना पाठिंबा देत आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची फौज भाजपमागे उभी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे बापटांच्या माघारीने संकटात सापडलेल्या भाजपला मोठा दिलासा मिळाला. मनसेच्या पाठिंब्यावर विविध प्रश्न उपस्थित होत असताना फडणवीसांनीच या प्रश्नांचं उत्तर दिलं.

कधीकाळी मनसेला तुम्ही मतदार नसलेली सेना, उमेदवार नसलेली सेना, असं म्हणून डिवचत होतात, त्यांच्यावर टीका करुन हिणवत होतात. मात्र आज तुम्हाला मनसेच्या पाठिंबाची का गरज पडली? तुम्ही मतदार नसलेल्या सेनेचा कसा काय पाठिंबा घेतला? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीसांनी सारवासारव केली.

ते म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत सगळ्यांनाच मदत घ्यावी लागत आहे. महत्त्वाचं म्हणजे मनसेने आपली भूमिका हिंदुत्ववादी केली आहे. म्हणून हिंदुत्ववादी या ब्रॅकेटमध्ये जे कोणी असेल ते आम्हाला कधीही चालतात, असं उत्तर देऊन फडणवीसांनी वेळ मारुन नेली. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरानंतर मनसे यापूर्वी हिंदुत्ववादी नव्हती का? मनसेने यापूर्वी हिंदुत्ववादी भूमिका कधी घेतली नाही का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जातोय.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.