Type Here to Get Search Results !

एक लाईकला 50 रुपये; कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या आयटी अभियंता तरुणीला साडेआठ लाखांचा गंडा

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पार्ट टाईम नोकरीच्या (Part Time Job) आमिषाने आयटी कंपनीत काम करणार्‍या अभियंता तरुणीला सायबर चोरट्यांनी (cyber thieves) तब्बल 8 लाख 53 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. या प्रकरणी बाणेर (Baner) येथील 27 वर्षीय तरुणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत घडली. (pune crime news)

सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क केल्यानंतर एक लाईकला प्रत्येकी पन्नास रुपये मिळतील, असे प्रलोभन दाखवून संबंधित तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आयटीमध्ये नोकरी करते. मैत्रिणीसोबत बाणेर परिसरात ती वास्तव्यास आहे. सध्या तिचे वर्क फ्रॉम होम काम सुरू आहे. 10 जानेवारी रोजी तिच्या मोबाईलवर सायबर चोरट्याने मेसेज करून पार्ट टाईम जॉबसाठी सोशल मीडियावर एक लाईक केल्यास पन्नास रुपये मिळतील, असे सांगितले.

तरुणीने तसे लाईक करून त्याचे स्क्रीन शॉट पाठविले. आरोपींनी देखील तिला विश्वास वाटावा म्हणून सुरुवातीला तिच्या बँक खात्यात पैसे पाठविले. त्यानंतर तिला जास्तीचे प्रलोभन दाखवून पैसे भरण्याचे व त्यावर नफा मिळविण्याचे टास्क दिले. त्यानंतर तरुणी सायबर चोरटे सांगतील तसे पैसे भरत गेली. एकूण तिने 8 लाख 53 हजार रुपये भरल्यानंतर ना मुद्दल परत मिळाले ना नफा.

फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामन (Police Inspector Crime Ankush Chintaman) करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.