Type Here to Get Search Results !

Pune Crime: मॉर्निंग वॉकला जाताना मौल्यवान दागिने घालून जाऊ नका; एकाच तासात 4 जणांना झटका

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

people robbed at bibwewadi, dhankawadi, dattavadi - checkmate times

पुणे, दि. 29 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): सहकारनगर, दत्तवाडी, कोंढवा आणि बिबवेवाडी या ठिकाणी सोमवारी केवळ तासाभरात तीन महिलांसह चारजणांच्या सोनसाखळ्या हिसकावून (Jewellary Robbed) नेल्याच्या घटना घडल्या. शहरात चोरट्यांकडून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. पादचारी नागरिकांना लुबाडण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील (Pune-Satara Road) धनकवडी (Dhankawadi) परिसरात शंकर महाराज मठाजवळ (Shakar Maharaj Math) पदपथावरून महिला पायी जात होती. दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून (Jewellary Robbed) नेले. याबाबत लता राजू धोतले (Lata Raju Dhotale) (वय 51, रा. बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत, कचरा बाहेर टाकण्यासाठी आलेल्या महिलेचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ही घटना पर्वती गावात नंदादीप सोसायटीसमोर (Nandadeep Society) सोमवारी घडली. याप्रकरणी मनीषा संदीप शेलार (वय 33, रा. पर्वतीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - Pune Crime News: तंबाखू व्यापाऱ्याला भर दिवसा ४७ लाखांचा लावला चुना; पुण्यातील धक्कादायक घटना

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.