Type Here to Get Search Results !

Pune Crime: बायको नांदायला येत नाही म्हणून नवऱ्याने बायकोच्या गाडीसह पार्किंग मधील सर्व गाड्या पेटवल्या

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

husband burned up vehicles as wife does not live with him - checkmate times 

पुणे, दि. 15 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): आजकाल खरंच पुणे शहरात कधी काय होईल काही सांगताच येत नाही. आज पहाटे पुण्यामध्ये कोंडवा भागात चार दुचाकी एक चार चाकी आणि एक रिक्षा या जळून खाक (Vehicles burned up) झाल्या. (Pune Crime News)

या गाड्या ज्या व्यक्तीने जाळल्या आहेत त्या व्यक्तींचं कारणच विकृत आहे. या व्यक्तीने या गाड्या जाळल्या आहेत कारण त्याची बायको नांदायला येत नव्हती. या व्यक्तीचे नाव टेरेन्स डॉमिनिक जॉन (Terence Dominic John) असे आहे.

हेही वाचा - पत्नी नांदायला येत नसल्याने पत्नी’सह सासूवर देखील कुऱ्हाडीने केले वार

मिळालेल्या महितीनुसार, या व्यक्तीच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. पण काहीच काम धंदा करत नाही म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला पण आपल्या पत्नीने आपल्याच सोबत राहावं म्हणून चिडलेल्या टेरेन्सने थेट पत्नीच्या दुचाकीसह तीन दुचाकी एक चार चाकी आणि रिक्षा थेट पेट्रोल टाकून जाळून टाकली. (Pune crime news)

हेही वाचा - 'बायकोला नांदायला पाठवणार नसाल तर सासुबाई तुम्हीच चला', जावयाची मागणी

या व्यक्तीला राग इतका अनावर झाला की, त्याने केवळ आपल्या पत्नीची दुचाकी जाळून राग शांत करण्याऐवजी इतर नागरिकांच्या देखील विनाकारण गाड्या जाळून खाक केले. या घटनेमध्ये या गाड्यांचा प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.