Type Here to Get Search Results !

Pune Crime: बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news 

suspicious dead body of engineer b.s. shinde found in khed - checkmate times

पुणे, दि. 15 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): खेड पंचायतसमिती मधील बांधकाम विभागातील शाखा अभियंता बी एस शिंदे (B. S. Shinde Khed) यांचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली. याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र या घटनेमुळे प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि. 14 मार्च 2023) खेड पंचायत समितीमध्ये बांधकाम शाखा अभियंता या पदावर कार्यरत असलेले बी. एस. शिंदे हे पंचायत समिती मधील एका कर्मचाऱ्याची दुचाकी घेऊन दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ऑफिस मधून बाहेर गेले. ते पुन्हा न आल्याने संबंधित दुचाकी मालक कर्मचारी आणि शिंदे यांच्या कारचा चालकाने त्यांना फोन लावण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा फोन बंद असल्याने कोणाचा संपर्क होत नव्हता.

दरम्यान, अनेक ठेकेदार आणि कर्मचारी त्यांचा शोध घेत होते. ते राजगुरूनगर वाडा (Rajgurunagar wada) रस्त्याने गेले असल्याचे काहींनी पाहिले होते मात्र फोन बंद होता. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बुट्टेवाडी रस्त्यावर काही जण जात असताना रस्त्यापासून 15 मिटर आत वनविभागाच्या हद्दीतील झाडामध्ये शिंदे यांचा मृतदेह आढळून आला.

त्यांनी नेलेले दुचाकी एका ठिकाणी तर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी होता. त्यांच्या शरीरावर कोणतीही घात पाताची खून नव्हती. औषध घेतल्याचा कोणताही पुरावा नव्हता. छातीवर हात ठेवून झोपल्यासारखा त्यांचा मृतदेह होता. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली मात्र संशयास्पद कोणतीच वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे अभियंता बी एस शिंदे याचा मृत्यू नक्की कसा झाला याबाबतची माहिती समोर आली नाही. (Pune Crime News)

खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात वाकळवाडी गावातील एका कामात भ्रष्टाचार झाल्याचा नुकताच मोठा गाजावाजा झाला होता. काम न करताच कामाचे बिल काढल्याचे उघड झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेला आले होते. त्यातच बांधकाम अभियंता शिदे यांचा संशयास्पद मृतदेह सापडल्यामुळे खेड पंचायत प्रशासन हादरले आहे. तर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - खेडशिवापूर टोल वसुलीचा ठेका ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे असेल, त्यांना मतदान करू नका; खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे आवाहन

या घटनेचा तपास खेड पोलियांकडून केला जात असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (PI Rajkumar Kendre) व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देवून झाडाझडती केली. मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर पुढील बाबींबद्दल माहिती मिळेल. (Pune Crime News)

खेड पंचायत समितीमध्ये काही वर्षांपूर्वी शिक्षण विभागात भ्रष्टाचार झाला होता त्यावेळी एका लीपिकाने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता ड्युटीवर असताना बी. एस. शिंदे यांची हत्या की आत्महत्या यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - खेड शिवापूर टोल नाक्यावर तब्बल ८ किलो गांजा पकडला; पाच जण गजाआड

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.