Type Here to Get Search Results !

Pune News: पुणेरी टोमण्यांचा असाही प्रताप; तिच्या हृदयात निर्माण झाले ब्लॉकेज?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 8 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पतीच्या सततच्या टोमण्यांमुळे (Husband Taunts) आपल्या हृदयात ब्लॉकेज (Heart Blockage) निर्माण झालं, अशी तक्रार पुण्यातल्या एका महिलेने केली आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर आता तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. (pune news)

पुण्यातल्या धनकवडी (Dhankawadi) इथं राहणाऱ्या महिलेने ही तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार जुलै 2021 ते मार्च 2023 या कालावधीत घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचं 2021 मध्ये धनकवडी इथल्या प्रतीक यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र काही महिन्यांमध्ये पती आणि सासरची मंडळी आपल्याला वारंवार मानसिक त्रास देत असल्याचं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. दोन वर्षांपासून आपला सतत मानसिक छळ होत आहे. या त्रासामुळेच आपल्या हृदयात ब्लॉकेज आढळलं आहे, अशी तक्रार या महिलेने दिली आहे. (pune news)

हेही वाचा - राजगडावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा बालेकिल्ल्याच्या पायथ्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे शहरातील धनकवडी येथे राहणाऱ्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पती आणि सासरच्या इतर मंडळीच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये (Sahakarnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - घटस्फोटाचा निकाल लागला आणि पतीला आला हृदयविकाराचा झटका; पुण्यातील घटना

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes            

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/            

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times           

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes            

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes          

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n            

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes         

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.