Type Here to Get Search Results !

Koyta Gang: कोयता गँग’ची कोंढवे धावडे मध्ये भाईगिरी; धारदार शस्त्रे दाखवून नागरिकांमध्ये पसरवली दहशत

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 9 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): धारदार शस्त्रे हातात घेऊन ते हवेत फिरवत ‘आम्ही एरीयातले भाई आहोत, कोणी आमचे मध्ये आले तर खल्लास करुन टाकु.’ असे म्हणत दहशत करण्याचे प्रकार आता उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttamnagar Police Station) हद्दीत येऊन पोहोचले आहेत. कोंढवे - धावडे खडकमाळ (kondhwe-dhawade khadakmal) येथील किराणा मालाच्या दुकानासमोर ही घटना घडली आहे.

हेही वाचा - इंस्टाग्रामवर कोयत्यासह फोटो ठेवणे तरुणाला चांगलेच पडले महागात

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुतार व त्याच्या साथीदारांनी या दुकानासमोर येऊन, दुकानातील फ्रिजवर सिंमेटचे पेवर ब्लॉक मारुन, फ्रिजचे नुकसान केले. तसेच धारधार शस्त्रे हातात घेऊन ते हवेत फिरवत ‘आम्ही एरीयातले भाई आहोत, कोणी आमचे मध्ये आले तर खल्लास करुन टाकु.’ असे म्हणुन फिर्यादी यांना ‘दुकान बंद कर नाहीतर मारुन टाकेन’ अशी धमकी दिली आहे.

याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी चंद्रकात दत्तात्रय सुतार (Chnadrakant Dattatrya Sutar) (वय - 30), सुरज अर्जुन गायकवाड (वय - 22), राहुल रमेश धोडगे (Rahul Ramesh Dhodge) (वय - 28), अर्थव मारुती यनपुरे (Atharva Maruti Yanpure) (वय - 19) (सर्वजण रा. न्यु कोपरे रोड, न्यु कोपरे, उत्तमनगर) यांना अटक करण्यात आले आहे. यातील एक जण फरार आहे. याबाबतचा अधिक तपास उत्तमनगरचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (Uttamnagar Assistant Police Inspector Umesh Rokade) करीत आहे.

हेही वाचा - तलवार, कोयत्यासह रिल्स बनवणार्‍या तिघांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (Police Inspector Sunil Jaitapurkar of Uttamnagar Police Station) यांनी सांगितले कि,“धुलीवंदनाच्या दिवशी मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या हि घटना घडली आहे. आरोपी दारु पिऊन दुचाकीवरून या परिसरात फिरत होते. त्यांच्या हातात हत्यार होती. त्यानंतर त्यांनी कोंढवे - धावडे येथील खडकमाळ वस्ती परिसरात जाऊन दुकानाचे नुकसान करीत दुकानदाराला धमकी देत दहशत पसरविण्याचा प्रकार केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/              

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times             

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes              

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes            

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n               

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes           

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.