Type Here to Get Search Results !

तलवार, कोयत्यासह रिल्स बनवणार्‍या तिघांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार व कोयत्यासह रिल्स (Reels) बनवणार्‍या तिघा जणांवर शिक्रापूर पोलिसांकडून (Shikrapur Police, shirur) गुन्हा दाखल केला आहे. (pune crime news)

पोलिसांनी ओमकार ऊर्फ पांडा बाळासाहेब कुंभार (omkar / panda balasaheb kumbhar) (वय 23), दुर्वांश शिवाजी क्षेत्री (Durvansh Shivaji Kshetri) (वय 23), दिलावर सुभान शेख (तिघेही रा. महाबळेश्वरनगर शिक्रापूर, ता. शिरूर) या तिघांवर गुन्हे दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलिसांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिक्रापूर हद्दीमधील महाबळेश्वर नगरमध्ये (mahabaleshwar nagar) लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरिता तीन मुले हातात कोयता व तलवार घेऊन रस्त्यावर फिरत आहेत.

पोलीस अधिक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal) यांच्या सूचनेनुसार शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (Shikrapur Police Inspector Pramod Kshirsagar) यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिसांनी सोशल मीडियातील फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) याची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत दोन मुलांना एक कोयता व एक तलवारीसह ताब्यात घेतले, तर एकजण हातातील कोयता टाकून पळून गेला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Upper Superintendent of Police Mitesh Ghatte), पोलीस उपाधीक्षक यशवंत गवारी (Deputy Superintendent of Police Yashwant Gawari), शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जितेंद्र पानसरे (Jitendra Pansare), पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने (Shrimant Honmane), अमोल दांडगे (Amol Dandge), पोलीस नाईक मिलिंद देवरे (Police Naik Milind Deore), अमोल नलगे (Amol Nalage), रोहिदास पारखे (Rohidas Parkhe), विकास पाटील (Vikas Patil), शिवाजी चितारे (Shivaji Chitare), पोलीस जवान जयराज देवकर (Jayraj Devkar), निखिल रावडे (Nikhil Ravade), किशोर शिवणकर (Kishor Shivankar), लखन शिरसकर (Lakhan Shiraskar) यांनी केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.