Type Here to Get Search Results !

Madhuri Pawar Birthday | रील्स स्टार माधुरी पवारचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा झाला; प्रत्येकाने करावे याचे अनुकरण

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

reel star madhuri pawar birthday celebration - checkmate times

पुणे, दि. 25 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): आयुष्याची सुरुवात होते तो दिवस म्हणजे वाढदिवस आणि वाढदिवस हा प्रत्येकासाठी विशेष असतो, त्या दिवसाचा आनंद कसा लुटायचा याचा विचार प्रत्येकजणच करत असतो. मंगळवार दि. 21 मार्च 2023 ला अभिनेत्री माधुरी पवारने (Reel Star Madhuri Pawar Birthday) तिचा विशेष दिवस सामाजिक बांधिलकी (Social commitment) जपत साजरा केला आणि या दिवसामुळे ती स्वत:ला खूप भाग्यवान (Lucky) मानत आहे.

अभिनेत्री माधुरी पवारने सातारा (Satara) येथील आशाभवन मतिमंद मुलांच्या शाळेला भेट देऊन तिचा वाढदिवस साजरा केला. शाळेतील मुलांना शाळेत (Asha Bhavan School for Mentally Retarded Children) लागणाऱ्या वस्तूंचे वाटप देखील केले. याप्रसंगी माधुरी जास्तच भावूक (Emotional) झाली. कारण आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण कधीच पूर्णपणे समाधानी (Satisfied) नसतो किंवा छोट्याशा गोष्टीची किती मोठी किंमत असते हे आपल्याला नाही जाणवत. पण आशाभवन शाळेला भेट दिल्यावर तिला जाणवलं की, सर्वात कमनशिबी (common destiny) तर आपण आहोत. येथील सर्वजण मनापासून छोट्या-मोठ्या गोष्टींचा आनंद लुटत आहेत.

या अनुभवाबद्दल व्यक्त होताना माधुरीने सांगितले की,“वाढदिवस म्हणजे हा असा दिवस ज्या दिवशी आयुष्याची सुरुवात केली जाते नवीन प्रकारे. अशा निस्वार्थी निखळ (Selfless) मुलांमध्ये, स्त्रियांमध्ये अशा वातावरणात वाढदिवस साजरा करून मला परत एकदा नवीन ऊर्जा (New energy) मिळाली. खारीचा वाटा इतका का होईना, पण त्यांच्या आयुष्यात काहीतरी आनंद देण्याचा योग माझ्या आयुष्यात आला तोही माझ्या वाढदिवसानिमित्ताने आणि मला ही कल्पना सुचवली त्यासाठी परमेश्वराचे खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांचे खूप आभार आज त्यांच्यामुळे ‘माधुरी पवार’ हे नाव, हा ब्रँड (Madhuri Pawar Brand) तयार झाला त्या नावाखाली खूप चांगल्या गोष्टी करता येतायत, प्रेक्षकांनी असंच प्रेम माझ्यावरती ठेवावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि वाढदिवसासाठी तुम्ही दिलेल्या वेगवेगळ्या शुभेच्छांसाठी देखील मनापासून धन्यवाद.”

माधुरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या निरागस मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण भरले गेले ही भावना प्रत्येक माधुरीच्या फॅन्सच्या मनात येणार आणि माधुरीने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली असं म्हणू शकतो. या सर्व सेलिब्रेशनचं श्रेय आयोजक ‘माधुरी ताई पवार फॅनक्लब सातारा’ (Madhuri Tai Pawar Fanclub Satara) यांना जातं, कारण त्यांनी माधुरीची ही अनोख्या पध्दतीने वाढदिवस (Unique Idea of Birthday Celebration) साजरा करण्याची कल्पना सत्यात उतरवली.

हेही वाचा - यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे शहरभर पोस्टर्स, पण पवार कुटुंबीय गायब, नक्की काय बिनसलं

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes            

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes            

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.