Type Here to Get Search Results !

मित्राने दिलेल्या वचनांची पूर्ती ही साहित्य क्षेत्रातील दुर्मिळ घटना; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

sahityadeep pratishthan announced award - checkmate times

पुणे, दि. 20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): सुप्रसिद्ध गझलकार कै अनिल कांबळे (Late Poet Anil Kamble) यांनी जाहीर केलेल्या पुरस्काराची वचनपूर्ती साहित्यदीप प्रतिष्ठानने (Sahityadeep Pratishthan) केली, अशी घटना साहित्य क्षेत्रात दुर्मिळ (Rare Occurrence in Literature) आहे असे प्रतिपादन 89 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (President of the 89th Sahitya Samelan Dr. Shripal Sabnis) यांनी केले. निमित्त होते “साहित्यदीप” संस्थेच्या 'काव्यमग्न' या पुरस्कार (Kavyamagna Award) वितरण सोहळ्याचे.

सुप्रसिद्ध गझलकार / कवी अनिल कांबळे यांनी 2017 साली जाहीर केलेले पुरस्कार, त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते देऊ शकले नव्हते. पण 'साहित्यदीप' चे मार्गदर्शक, सल्लागार आणि काहीकाळ उपाध्यक्ष राहिलेल्या कांबळे यांच्या या वचनाची पूर्तता (Fulfillment of promise), साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे (Jyotsna Chandgude) आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर (Dhananjay Tadwalkar) यांच्यासह साहित्यदीप परिवाराने केली.

रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी कवयित्री कविता क्षीरसागर (Kavita Kshirsagar), भाग्यश्री देसाई (Bhagyashree Desai), कवी राजेंद्र वाघ (Rajendra Wagh) आणि बबन धुमाळ (Baban Dhumal) यांना 'काव्यमग्न' हा पुरस्कार एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करून, साहित्यदीप' ने ही वचनपूर्ती केली आणि याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी पुढे बोलताना डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, दिवंगत गझलकार अनिल कांबळे यांनी 'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' ही एकच गझल लिहिली असती तरी त्यांचे नाव अजरामर झाले असते.

यावेळी कामगार भुषण पुरस्कार विजेते कवी राजेंद्र वाघ यांची मराठीचे गुणगाण गाणारी कविता आणि तिला दिलेली 'हापूस' आंब्याची उपमा छान होती. "भुकेल्यापोटी पाण्यालाही भाकरीचा वास येतो" ही बबन धुमाळ यांची कल्पना खऱ्या अर्थाने भुकेची वेदना सांगून गेली. आत्मा आणि परमात्मा यांची सांगड घालणारी कविता भाग्यश्री देसाई यांनी सादर केली. तर कविता क्षीरसागर यांनी कवितेवरची कविता वाचून कवितेचे महात्म्य विशद केले.

हेही वाचा - आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्यावर पुण्याची “माय मराठी” कविता गाजली

पुरस्कार प्राप्त चौघांनीही अतिशय भावपूर्ण मनोगते व्यक्त केली आणि साहित्यदीपचे आभार देखील मानले. सुरुवातीला साहित्यदीपच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे यांनी आपल्या प्रास्ताविकात साहित्यदीपची माहिती सांगताना, संस्थेचा हा 183 वा कार्यक्रम असल्याचे सांगितले आणि 'काव्यमग्न' या पुरस्कारामागची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कवयित्री शिल्पा जगनाडे (Shilpa Jagnade) यांनी केले. या वेळी व्यासपीठावर साहित्यदीपचे सल्लागार कवी वि. सु. चव्हाण (V S Chavan) आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर देखील उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.