Type Here to Get Search Results !

Pune news: कोथरूड मध्ये ओपन जीमवर व्यायाम करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

man died by electric current at open gym in bhusari colony - checkmate times

पुणे, दि. 21 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): ओपन जीमवर (Open Gym) व्यायाम करताना (Pune News) विजेचा धक्का बसून एका युवकाचा मृत्यू झाला. काल (दि. 20) संध्याकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

अमोल शंकर नाकते (Amol Shankar Nakate) (वय - 22 रा. भूगाव) असे त्या युवकाचे नाव होते. उजव्या भुसारी कॉलनीत (Bhusari Colony) ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा इव्हेंट मॅनेजमेंट (event management) ची कामे करायचा. तो रोज संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या (sanyukt bhusari colony mitra mandal) मैदानात मित्रांसोबत यायचा. आजही तो व्यायाम करता करता फोनवर बोलत होता. अचानक तो खाली पडल्याचे पाहून मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली.

त्याला जवळच्या इस्पितळात दाखल केले गेले. त्याच्या पायातून विजेचा प्रवाह वाहिल्याने पायाची बोटे काळेनीळे झाले होते. डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले.

खुल्या मैदानात असलेल्या जॉगिंग ट्रॅक व ओपन जीमच्या खेळण्याखालून विजेच्या वाहिन्या जात आहेत. या विजेचा धक्का बसून अमोलचा मृत्यू झाला. या घटनेचा (Pune News) अधिक तपास कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Kothrud Police Station Senior PI Hemant Patil) करत आहे.

हेही वाचा - विजेचा धक्का लागून कर्वेनगर मधील मुलाचा मृत्यु; महावितरणच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.