Type Here to Get Search Results !

विजेचा धक्का लागून कर्वेनगर मधील मुलाचा मृत्यु; महावितरणच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

 

पुणे, दि. 13 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): विजेचा धक्का लागून नववीत शिकणाऱ्या एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ओमकार सोसायटीमध्ये नुकतीच घडली. याप्रकरणी मंजुनाथ पुजारी (वय 57, रा. बराटे चाळ, कर्वेनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत महावितरणच्या कात्रज विभागातील अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत फिर्यादींचा मुलगा ऋषिकेश मंजुनाथ पुजारी (वय 14) या मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना येथे 23 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार सोसायटीमधील गार्डनमध्ये महावितरणच्या विजेच्या खांबावरील वीजवाहिनी जमिनीपासून चार फुटावर लोंबकळत होती. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली गेली नाही.

दरम्यान, कर्वेनगर येथील मंजुनाथ पुजारी हे कामानिमित्त कात्रजला आले होते. त्यांचा मुलगा ऋषिकेश हा त्यांच्यासोबत आला होता. तो खेळताना गार्डनमध्ये गेलेला बॉल आणण्यासाठी गेला. त्यावेळी विजेचा धक्का बसून तो गंभीर भाजला. उपचारादरम्यान त्याचा 30 ऑक्टोबर 2022 रोजी मृत्यू झाला.

याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर हलगर्जीपणा केल्यामुळे ऋषिकेशचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून शिवलिंग बोरे या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com    

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.