Type Here to Get Search Results !

Pune Crime: घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने सिंहगड रस्त्यावर आवळल्या मुसक्या

या महत्वाच्या प्रश्नावर आपले मत मांडल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद 

पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?

तुम्ही तुमचे मत मांडले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. त्वरित लिंक वर क्लिक करून आपले मत द्या.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 28 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्याच्या ताब्यातून सुमारे 11 लाख रुपये किमतीचे दोनशे ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. (pune crime news)

आरोपी जयवंत ऊर्फ जेडी गोवर्धन गायकवाड (वय 34, रा. आंबेडकर वसाहत, डीपी रोड, औंध) (Jaywant alias JD Govardhan Gaikwad) हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहर परिसरात घरफोडी आणि चोरीचे 80 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांनी याबाबत माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भूमकर चौक, नऱ्हे भागात असल्याची माहिती युनिट तीनचे सहायक फौजदार संतोष क्षीरसागर यांना मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सिंहगड रोड, सांगवी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याचे सांगितले. त्याच्याकडून 11 लाखांचे दोनशे ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले. त्याच्याकडून सिंहगड रोड हद्दीतील एक, सांगवी तीन आणि तळेगाव दाभाडेतील एक असे पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-1 सुनील पवार, युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, राहुल पवार, सहायक फौजदार संतोष क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा -

(Commissioner of Police Ritesh Kumar, Joint Commissioner of Police Sandeep Karnik, Additional Commissioner of Police Crime Branch Ramnath Pokle, Assistant Commissioner of Police Crime-1 Sunil Pawar under the guidance of Deputy Commissioner of Police Amol Zende, Senior Police Inspector of Unit Three Srihari Bahirat, Sub Inspector of Police Ajit Kumar Patil, Rahul Pawar, Assistant Faujdar Santosh Kshirsagar)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.