Type Here to Get Search Results !

Fraud: कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचा आरोप; लवकरच होणार निर्णय

या महत्वाच्या प्रश्नावर आपले मत मांडल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद

पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे काआणि कशी?

तुम्ही तुमचे मत मांडले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. त्वरित लिंक वर क्लिक करून आपले मत द्या


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

allegation against fake documents by candidates for pmc job - checkmate times

पुणे, दि. 28 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये (Junior Engineer Recruitment) बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका Petition to the High Court) दाखल झाल्या आहेत. महापालिकेनेही या तक्रारींची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. याचा अहवाल 10 मे 2023 पर्यंत सादर केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेची फसवणूक करून नोकरी मिळविल्याचे स्पष्ट झाले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, पुणे महापालिकेने गेल्या वर्षी 448 जागांची भरती केली. त्यामध्ये 135 जागा या कनिष्ठ अभियंत्यांच्या आहेत. या जागांसाठी तब्बल 12 हजार पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. ऑनलाइन परिक्षेनंतर महापालिकेने 450 जणांची गुणवत्ता यादी जाहीर करून त्यातून गुणवत्तायादीत पुढे असलेले व कागदपत्रांची पडताळणी करण्यात पात्र ठरलेल्या 35 जणांची अंतिम निवड करून त्यांना महापालिकेच्या नोकरीत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला.

ही 135 जणांची यादी जाहीर केल्यानंतर यातील काही उमेदवारांबाबत सेवक वर्ग विभागाकडे प्रत्यक्षात तसेच इमेलद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या. महापालिकेने कागदपत्रांची पडताळणी करताना तीन वर्षाचा अनुभवाचा पुरावा म्हणून सादर करण्यासाठी 11 प्रकारची कागदपत्र आवश्‍यक होते. त्यामध्ये फॉर्म 16, बँक स्टेटमेंट, पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र, पीएफ क्रमांक यासह इतर कागदपत्रांचा समावेश होता. त्यामध्ये पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र यासारखी कागदपत्र बनावट तयार करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला आहे.

तसेच काही जणांनी अभियांत्रिकी डिप्लोमाच्या आधारावर नोकरी मिळवताना त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे हे लपविले आहे. तसेच एका शहरात अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेताना दुसऱ्या शहरात पूर्ण वेळ नोकरी केल्याचा अनुभवाचा दाखला जोडला आहे. याबाबत सेवक वर्ग विभागाकडे पुराव्यासह तक्रारी दाखल झाल्या आहेत.

अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्याच दरम्यान निवड यादीतील सुमारे 5 ते 6 जणांनी वैयक्तिक कारणास्तव महापालिकेत नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या याचिकांवर आता 10 जून 2023 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा -

दरम्यान, महापालिकेने यासंदर्भात सेवक वर्ग विभागाचे उपायुक्त सचिन इथापे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि मुख्य लेखा परिक्षक अमरिश गालिंदे (Sachin Ethape, Deputy Commissioner of Servants Division, City Engineer Prashant Waghmare and Chief Auditor Amrish Galinde) ही तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. ही समिती ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत, अशांची वैयक्तिकरित्या कागदपत्रांची पडताळणी करत आहे. यामध्ये बनावट कागदपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांना नोकरीतून कमी केले जाणार आहेच, पण महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

“कनिष्ठ अभियंता प्रकरणी महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, याचा अहवाल 10 मे पर्यंत सादर केला जाणार आहे. यात महापालिकेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.” असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Additional Commissioner of Municipal Corporation Ravindra Binawade) म्हणाले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.