Type Here to Get Search Results !

Pune Crime | उत्तमनगर मध्ये नराधम बापाचे पोटच्या पोरीवर लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

father sexually harrased daughter in shivane, uttamnagar - checkmate times

पुणे, दि. 3 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील उत्तमनगर (Uttam Nagar, Pune) भागातून एक धक्कादायक माहिती समोर आली असुन, सख्ख्या बापाने पोटच्या पोरीवर लैंगिक अत्याचार केल्याची (Sexually Abused by Father) धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम बापावर 43 वर्षीय आईच्या फिर्यादीवरून पोक्सो (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उत्तमनगर पोलिसांनी त्याला अटक (Uttam Nagar Police Arrested) केली आहे. (Pune Crime News)

याबाबत उत्तमनगर पोलिसांनी (Uttamnagar Police Station) दिलेल्या माहितीनुसार, शिवणे मधील शिंदे पुलाजवळ (Shinde Pool Shivane) असलेल्या एका सोसायटीत हे पती, पत्नी आणि त्यांची 7 वर्षांची मुलगी गेल्या 10 वर्षांपासून राहत असून, ते मुळचे उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर सदरील नराधम बाप एका कन्स्ट्रक्शन कंपनीत (Construction Company) कामाला असून, त्याने आपली पत्नी घरात नसल्याचा गैरफायदा घेत, मुलीला अश्लील व्हिडीओ (Porn Videos) दाखवून, तिच्याशी लैंगिक चाळे (Sexual Harassment) केले.

दरम्यान मुलीला प्रातर्विधी करण्यास त्रास होत असल्याने आईने तिला दवाखान्यात नेल्यानंतर, डॉक्टरांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, सदरील धक्कादायक बाब समोर आली. पप्पांनी मोबाईलवर व्हिडीओ दाखवले आणि लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. तर “हे कुणाला सांगू नकोस, नाहीतर तुला आणि तुझ्या आईला मारुन टाकेन” अशी धमकी दिल्याचे मुलीने सांगितले. (Pune Crime News)

याबाबत सदरील 7 वर्षांच्या मुलीच्या आईने उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, नराधम बापाला गजाआड करण्यात आले आहे. पुढील तपास उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior PI Sunil Jaitapurkar), गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख (Crime PI Shabnam Shaikh) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे (API Amruta Chavare) करत आहेत.

हेही वाचा - Pune Crime News | कर्वेनगर मध्ये वडिलांनी केला स्वत:च्या मुलीचा विनयभंग; वडील आणि आजी विरोधात गुन्हा दाखल | POCSO Act

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.