Type Here to Get Search Results !

Pune Crime: ‘आम्ही कोण आहोत माहिती आहे का?’ असे म्हणून गस्तीवरील पोलिसाला धक्काबुक्की करून मारहाण

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

three men beten up police beat marshall at undri - checkmate times

पुणे, दि. 4 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): रस्त्यात थांबलेल्या संशयास्पद मोटारीबाबत चौकशी करणाऱ्या पोलीस बीट मार्शललाच तिघांनी मारहाण केल्याची घटना (Police beat marshal who was investigating was beaten up by three people) घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ही घटना रविवारी (दि. 4 एप्रिल 2023) रात्री 1 वाजता उंड्री येथे घडली. याबाबत पोलीस अंमलदार रोहित बळवंत पाटील (Police Rohit Balwant Patil) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मितेश संजय परदेशी (Mitesh Sanjay Pardeshi) (वय 32, रा. वानवडी), मनीष जयप्रकाश मेहता (Manish Jaypraksh Mehta) (वय 36, रा. दापोली, जि. रत्नागिरी) आणि सुमीत राजेश परदेशी (Sumit Rajesh Pardeshi) (वय 36, रा. वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पाटील (Rohit Patil) हे उंड्री येथे बीट मार्शल म्हणून ड्यूटीवर आहेत. त्यांना रविवारी रात्री एकच्या सुमारास रस्त्यावर एक मोटार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे आढळून आले. बीट मार्शलने मोटारीत बसलेल्या तिघांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी ‘आम्ही कोण आहोत माहिती आहे का?’ असे म्हणून बीट मार्शलला धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी देवून सरकारी कामकाजात अडथळा आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा - Pune Police: वाहतुक पोलिसांना वैतागून नागरिकांचा पोलीसांवर वॉच

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.