Type Here to Get Search Results !

Pune News: मित्रासोबत भाटघर धरणावर फिरायला आलेली तरुणी बुडाली

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

woman drown at bhor dam - checkmate times

पुणे, दि. 4 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): भोर (Bhor) येथील भाटघर धरणाच्या (Bhatghar Dam) भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या वेळवंडी व नीरा नदीच्या (Velvandi and Neera River) संगमाजवळ खटाव (जि. सातारा) (Khatav, Satara) येथील तरूणी बुडाली. पोलीस (Police), आपत्ती व्यवस्थापन कक्ष (Disaster Management Room) आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे (Sahyadri Rescue Force) जवान तिच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. सोमवारी (दि. 3 एप्रिल 2023) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी निगुडघर (ता. भोर) (Nigudghar, Bhor) येथील तरुण आणि संबंधीत तरुणी हे दोघे भाटघर धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते. धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला पॉवर हाऊसच्या जवळ नदीच्या कडेला पाण्यात पाय सोडून दोघेही बसले असतांनाच मुलीचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली आणि धरणातून पाणी सोडले असल्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून गेली. तिच्यासोबत असलेल्या तरुणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास यश आले नाही.

यानंतर संबंधीत तरुणाने भोर पोलीस ठाण्यात (Bhor Police Station) जाऊन पोलिसांना खबर दिली. भाटघर धरणाशेजारील घटनास्थळ हे शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) (Shirval) यांच्या हद्दीत येत असल्यामुळे भोर पोलिसांनी शिरवळ पोलिसांना कळविले असून भोरचे पोलीस, भोरमधील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान हे शिरवळ पोलिसांसमवेत संबंधीत तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.