Type Here to Get Search Results !

Pune Crime | सिंहगड रोडवरील आयुर्वेदिक उपचार सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; मालक आणि चालक ताब्यात

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

Prostitution business in Ayurvedic treatment center on Sinhagad Road exposed

पुणे, दि. 4 मे 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्यावर (Sinhgad Road) आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या (Ayurvedic Treatment Centre) नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Prostitution) पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Department of Social Security) पर्दाफाश केला असून, 1 लाख 52 हजारांच्या मुद्देमालासह उपचार केंद्राच्या मालक आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.


 



sachin dodke birthday


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग (Manikbaugh Sinhgad Road) मध्ये असलेल्या अभिमन्यु पुरमच्या (Abhimanyu Puram) तिसऱ्या मजल्यावरील ऑफिस नं. 9 मध्ये आयुर्वेदिक उपचार सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याबाबत पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदारांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक (Fake Customer) पाठवुन खात्री केली.


 



Shubhankar Heights, RMD College, Warje Malwadi, Pune


यामध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Retesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Police Commissioner of Crime Branch Ramnath Pokle), गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त अमोल झेंडे (DCP Crime Amol Zende) यांचे आदेश आणि मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior PI Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार अनिकेत पोटे, अजय राणे, तुषार भिवरकर, रेश्मा केक, अमित जमदाडे, ओंकार कुंभार यांच्या पथकाने तात्काळ छापा कारवाई करून, सदर ठिकाणावरून 2 पिडीत महिलांची सुटका केली.


 





दरम्यान सदर ठिकाणाहून मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण 1 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या आयुर्वेदिक सेंटरचे मालक व चालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याविरूध्द सिंहगड पोलीस स्टेशन (Sinhgad Road Police Station) मध्ये अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार (Human Trafficking Act) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता सिंहगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.