Type Here to Get Search Results !

Koyta Gang: सिंहगड रोडला भाईगिरी; पुन्हा लोखंडी शस्त्रे काढून टोळक्याने माजवली दहशत

 पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

attack with koyta on sinhagad road - checkmate times

पुणे, दि. 5 मे 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत एका सराईत गुन्हेगाराने पूर्ववैमनस्यातून आपल्या साथीदारासह राडा केला. 21 वर्षीय तरुणाच्या डोक्यात कोयत्याने (Koyta Gang) वार करत त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. ‘आम्ही इथले भाई आहोत’ म्हणत त्याने संपूर्ण परिसरात दहशत देखील माजवली. (Pune Crime News)

पंकज रामदास तावरे (वय 21) या तरुणाने याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार रोशन काकडे, सद्दाम शेख, ओंकार लोहकरे, ओंकार गायकवाड, किसन गोंधळी (Roshan Kakade, Saddam Sheikh, Omkar Lohkare, Omkar Gaikwad, Kisan Gondhali) यांच्यासह आणखी दोन ते तीन आरोपींवर (Koyta Gang) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आरोपी रोशन काकडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

1 मे 2023 च्या रात्री साडेआठ वाजता वडगाव बुद्रुक येथील तुकाई नगर मध्ये (Tukainagar, Vadgaon Budruk) हा संपूर्ण प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादीच्या मित्राने आरोपीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी 'अंड्या तुझा मित्र आहे ना, आज तुला खल्लास करतो' असे म्हणून धारदार हत्याराने फिर्यादीच्या मानेवर डोक्यावर आणि हातावर वार केले. फिर्यादीचा मित्र भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याच्याही डोक्यात हत्याराने वार (Koyta Gang) करून जखमी करण्यात आले. (Pune Crime News)

फिर्यादीचा पाठीवर छातीवर लाथा बुक्क्याने मारहाण करून ‘आम्ही इथले भाई आहोत आज तुला पण मारून टाकणार आणि तुझ्या मित्राला पण मारून टाकणार’ असे मोठमोठ्याने आरडाओरडा करून परिसरात दहशत वाजवली. सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.