Type Here to Get Search Results !

Pune Crime: फेशियलने केली सगळी घाण; मुमताजने केली ब्युटीशिअनला मारहाण

ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Beating due to allergy due to facial - checkmate times

पुणे, दि. 6 मे 2023 (चेकमेट टाईम्स): तुझ्या ब्युटी पार्लरमध्ये फेशिअल केल्याने मला अ‍ॅलर्जी झाली, असे म्हणत (allergy because of facial) महिलेला व तिच्या मुलीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एका महिलेसह तिच्या साथीदारांवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime News)

याबाबत कोंढव्यातील एका ब्युटीपार्लर चालक महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुमताज शेख (45) (Mumtaj Shaikh) सह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कोंढव्यात ब्युटी पार्लर आहे. त्या ब्युटी पार्लरमध्ये मुमताज शेख हिने फेशिअल केले होते; परंतु त्यानंतर तिच्या चेहर्‍यावर अ‍ॅलर्जी झाल्यामुळे ती थेट फिर्यादीच्या ब्युटी पार्लरमध्ये गेली. तेथे ‘तुझ्यामुळे मला अ‍ॅलर्जी झाली आहे’ असे म्हणत, औषधांचा खर्च दे म्हणत फिर्यादीला आणि तिच्या मुलीला मारहाण करत तिच्याबरोबर आलेल्यांनी विनयभंग (Molestation) केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Pune Crime News)

हेही वाचा -

बनावट सौंदर्य प्रसाधनांना आळा घालण्यात अपयश?

सध्या सर्वत्र बनावट सौंदर्य प्रसाधनांचा सुळसुळाट झालेला दिसतो आहे. नामांकित उत्पादनांच्या छापील किमतीपेक्षा कितीतरी कमी दराने तशीच हुबेहूब उत्पादने बाजारात सहज उपलब्ध झालेली दिसतात. अशी उत्पादने वापरून ग्राहकांची शारीरिक आणि मानसिक हानी झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातील अनेक घटना समोर येत नाहीत. अॅलर्जी झाली म्हणून ग्राहक डॉक्टरी इलाज करून गप्प बसतात. मात्र अशा प्रकारावर ठोस कारवाई होण्यासाठी एखादा स्वतंत्र विभाग कार्यरत होण्याची गरज असून, बनावट उत्पादनांनी निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्याशिवाय शासनाचे डोळे उघडणार नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.