Type Here to Get Search Results !

Ritesh Kumar: 9 हजार 500 पोलीस, 1 हजार गुन्हेगार, तरीही गुन्हेगारी का संपत नाही?; आयुक्तांचा सवाल

ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 6 मे 2023 (चेकमेट टाईम्स): शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमारांनी (Commissioner of Police Ritesh Kumar) काही पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) आढावा बैठकीत ‘कामगिरी दाखवा, नाहीतर उचलबांगडी नक्की’, असाच सज्जड इशारा दिला. पोलीस आयुक्तालयात गुरुवारी (दि. 4 मे 2023) ही बैठक पार पडली.

खडकी, मुंढवा, लोणी काळभोरबरोबरच अन्य (Khadki, Mundhwa, Loni Kalbhor) काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. त्याबाबत प्रतिबंधात्मक कारवाई केली असती, तर त्या रोखतादेखील आल्या असत्या. मात्र, तसे होताना दिसले नाही. ‘गुन्हेगार एक हजार असून, 9 हजार पाचशे पोलीस आहेत. ते गुन्हेगारी संपवू शकत नाहीत का?’ असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला.

यासोबतच सहायक पोलीस आयुक्तांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनादेखील प्रतिबंधात्मक कारवाईवर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. “पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश असला पाहिजे. त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर द्या. कारवाईमुळे घडू पाहणार्‍या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच रोखता येते. मात्र, तसे काम होताना दिसून येत नाही. गुन्हेगारी कमी करण्यासाठी तुम्ही सक्षम नसाल, तर तत्काळ वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारादेखील आयुक्तांनी दिला आहे.

गुन्हेगारी वाटेवर चालू पाहणार्‍या अल्पवयीन मुलांसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम हाती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या पालकांनादेखील या उपक्रमात सहभागी करून घेत त्यांना गुन्हेगारी कृत्यामुळे होणार्‍या गंभीर परिणामाची जाणीव करून देण्यात येणार आहे. यावेळी सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

(Joint Commissioner of Police Sandeep Karnik, Additional Commissioner of Police, Deputy Commissioner of Police, Senior Inspector of Police)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.