Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 11 मे 2023 (चेकमेट टाईम्स): निंबुत (ता. बारामती) हद्दीतील (Nimbut) ज्युबिलंट कंपनीच्या खत प्रकल्पामुळे (Jubilant Company's Fertilizer Project) ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. परिणामी, हा खत प्रकल्प बंद करण्याची मागणी निंबुत ग्रामपंचायतीने कंपनीला पत्राद्वारे केली आहे. तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा देत 8 दिवसांत लेखी उत्तर देण्याची मागणी पत्रातून केली आहे. या संदर्भात निंबुतच्या सरपंच निर्मला काळे (Nirmala Kale) यांनी ज्युबिलंट कंपनीस पत्र दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की,’ज्युबिलंट कंपनीमध्ये उसाच्या कच्च्या मटेरियलपासून खतनिर्मिती केली जाते, त्यामुळे गावात मच्छर, माशांसह अनेक किटकांचा प्रार्दुभाव वाढला आहे. सध्या गावठाणासह लक्ष्मीनगर, आनंदनगर, बी. जी. काकडेवस्ती परिसरात डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांनी अनेकांना ग्रासले आहे. तर कंपनीतून येणार्या उग्र वासाने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेकांना श्वसनाचे त्रास होत आहेत.’
तर ‘काही जणांच्या उपजीविकेचे साधन असलेली निरा नदीतील मासेमारीही धोकादायक आली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे सापडू लागले आहेत. याशिवाय निरा- बारामती मार्गावर खत प्रकल्पातून येणार्या वाहनांतून वारंवार मळी पडते, त्यामुळे अनेकांना अपघात घडत आहेत. तर रस्त्याची दुरवस्थादेखील होत आहे.’ असेही पत्रात नमूद केले आहे.
“कंपनीकडून या ठिकाणी सातत्याने फॉगिंग केले जाते. 22 एप्रिल रोजी फॉगिंग करण्यात आले होते. त्यानंतर 5 मे रोजी पुन्हा करण्यात आले आहे. स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.” असे ज्युबिलंटचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर (Jubilant Public Relations Officer Isaak Mujawar) म्हणाले.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes