Type Here to Get Search Results !

Pune G-20: माऊली अन् तुकारामांच्या आगमनावेळी पुण्यात असणार G20 बैठक

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

palkhi and g20 conference event management meeting in pune - checkmate times

पुणे, दि. 11 मे 2023 (चेकमेट टाईम्स): जून महिन्यात (June) पुण्यात होणाऱ्या जी-20 बैठकीच्या (G-20 Conference) नियोजनासाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर आले आहे. हे पथक विविध ठिकाणांची पाहणी करून बैठकांची रूपरेषा अंतिम करणार आहे. दरम्यान, 12 ते 14 जून 2023 दरम्यान होणाऱ्या बैठकीच्या काळात पुण्यात पालखी सोहळाही (Palkhi Sohala) असेल, त्यामुळे ही बाब महापालिकेने केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

पुण्यात जी-20 समूह देशांच्या इलेक्ट्रॉनिक्स गटाची येत्या 12 ते 14 जून 2023 दरम्यान आणि शिक्षणविषयक गटाची 19 ते 21 जून 2023 दरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपसचिव अनुपम अनिश चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी बैठक घेण्यात आली. तसेच काही संभाव्य ठिकाणांची पाहणीही केली.

या बैठकांची जागा, स्वरूप, रूपरेषा निश्चित करण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात आले आहे. या बैठकीच्या काळात पुण्यात पारंपरिक पालखी सोहळाही असणार आहे. त्यामुळे शहरातील काही रस्ते बंद केले जातात. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील होऊ शकते, ही बाब केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे पालखी सोहळा तसेच पाऊस लक्षात घेऊन नियोजन करावे लागणार आहे.

''शिक्षण गटाच्या बैठकीसाठी सदस्य देशांचे मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या तयारीचा आढावा व पाहणी बुधवारी केली जाणार आहे. तर यावेळी जी-20 बैठकींबरोबरच प्रदर्शन तसेच काही कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहे.” असे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी सांगितले.

पालिका आयुक्त विक्रम कुमार, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त ए. राजा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वैज्ञानिक संजय कौल, लवजीत सिंग, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्सचे (एनजीईडी) मुख्य कार्यकारी अधिकारी जगमोहन कथैत, अनूज कौशल आदी उपस्थित होते.

हेही वाचा -

(Municipal Commissioner Vikram Kumar, State Sports Commissioner Suhas Diwase, Special Branch Deputy Commissioner of Police A. Raja, Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad, Municipal Additional Commissioner Vikas Dhakne, Deputy Commissioner of Traffic Police Vijay Kumar Magar, Union Ministry of Electronics and Information Technology Scientist Sanjay Kaul, Lavjeet Singh, National e-Governance (NGED) Chief Executive Officer Jagmohan Kathait, Anuj Kaushal.) 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.