Type Here to Get Search Results !

Warje Crime: वारजे मध्ये दीड हजारांसाठी एकाचा खून; कोणतेही धागेदोरे नसताना 5 तासांत संशयित गजाआड

मिल्खा सिंग यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 8 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station) हद्दीतील स्व. सोनेरी आमदार रमेश वांजळे चौकातील (Late MLA Ramesh Wanjale Chowk) कै. पृथक बराटे उद्यानाच्या (Late Pruthak Barate Garden) दारात एका फिरस्त्याचा खून (Murder in Warje) झाल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर वारजे पोलिसांनी शिताफीने केलेल्या तपासात अवघ्या 5 तासांमध्ये संशयित आरोपीला गजाआड (Murderer Arrested) करण्यात वारजे पोलिसांना यश आले आहे. (Pune Crime News)

याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. 7 मे 2023 च्या मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान, स्व. सोनेरी आमदार रमेश वांजळे चौकातील कै. पृथक बराटे उद्यानाच्या दारात एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत मिळून आला होता. यावेळी त्याला उपचारार्थ ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) हलवण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी असलेल्या त्याचा मृत्यू झाला होता. तर शवविच्छेदन अहवालात त्याचा धारदार ब्लेडने वार करून, तसेच डोक्यात गंभीर आघात झाल्याचे मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

यानंतर वारजे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्या फिरस्त्याची माहिती गोळा केली असता, त्याचे नाव अमरजित जगन्नाथ गोयल (वय. 50, रा. मेहुली, ता.बिनती, जि. फतेहपुर, उत्तरप्रदेश) (Amarjit Jagannath Goyal) असे असल्याचे समजले. तर तो मिळेल ते काम करून पुलाखालीच राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यानंतर वारजे पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस शिपाई अमोल राउत यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत संशयित हल्लेखोराचा माग घेतला. तर पोलीस शिपाई बंटी मोरे आणि अजय कामठे यांनी गोपनीय माहिती गोळा करत, संशयित हल्लेखोराचा शोध घेऊन त्याला गजाआड करण्यात यश मिळवले. (Pune Crime News)

दरम्यान घटनास्थळी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज वरून आजूबाजूला सखोल चौकशी केली असता या घटनेचे दोन प्रत्यक्षदर्शी मिळून आल्याने संशयितावरचा संशय बळावून, त्याच परिसरात एका चायनीज सेंटर मध्ये काम करणाऱ्या राम श्रीमंत वाघमारे (वय.20 रा. वारजे उड्डाणपुलाखाली, मूळ रा. उस्मानाबाद) (Ram Shrimant Waghmare) याने त्याचा जुना मोबाईल हँडसेट मयत अमरजित गोयल याला विकला होता. त्याचे 1 हजार 500 रुपये देत नसल्याने गोयल याला वाघमारे याने दारूच्या नशेत प्रथम डोक्यावर मारहाण करून, गळ्यावर ब्लेडने गंभीर जखम करून रक्तबंबाळ केल्याचे समोर आले. यामध्ये वाघमारे याचे कोणी आणखीन साथीदार आहेत का याचा तपास चालू आहे.

यामधील मयत अमरजित गोयल याच्या मुलीचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्याने गावी जाण्यासाठी ठेकेदाराकडून 500 रुपये देखील घेतले होते. मात्र मिळालेल्या 500 रुपयांची दारू पिऊन तो पुलाखाली झोपला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर मारहाण केलेल्या गोयल याला जखमी अवस्थेत ससून येथे रुग्णवाहिकेतून नेताना हल्लेखोर राम वाघमारे हा देखील रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालकाला मदतनीस म्हणून ससूनला गेला आणि नंतर ससून मधून गुंगारा देऊन पसार झाला होता. मात्र नंतर तपासात तोच हल्लेखोर असल्याचे समोर आल्यानंतर वारजे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 5 तासांत त्याचा शोध घेऊन, त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. (Pune Crime News)

पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग सुनिल पवार (ACP Kothrud Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior PI Dagdu Hake), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे (Crime PI Dattaram Bagwe) यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे (PSI Rameshwar Parve), नरेन मुंडे (PSI Naren Munde), मनोज बागल (PSI Manoj Bagal), अरविंद काळे (PSI Arvind Kale), अमोल राऊत (Amol Raut), विजय भुरुक (Vijay Bhuruk), बंटी मोरे (Bunty More), श्रीकांत भांगरे (Shrikant Bhangare), विक्रम खिलारी (Vikram Khilari), अजय कामठे (Ajay Kamathe) यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. सहायक पोलीस निरीक्षक रमेश बाबर (API Ramesh Babar) तपास करत आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.