Type Here to Get Search Results !

कर्वेनगर मध्ये पाईपलाईनच्या खड्ड्यात पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


One dies tragically after falling into pipeline pit in Karvenagar; Demand to file a case against the contractor 

One dies tragically after falling into pipeline pit in Karvenagar; Demand to file a case against the contractor

 

पुणे, दि. 1 डिसेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर (Karvenagar) मधील काकडे सिटी (Kakade City) समोर असलेल्या उड्डाणपुलाशेजारी (Karvenagar Fly Over) सुरु असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (One dies tragically after falling into pipeline pit in Karvenagar) याबाबत वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये अकस्मात मयत दाखल करण्यात आले असून, संबंधित ठेकेदारावर नागरिकांच्या सुरक्षेची काळजी न घेता, नियमबाह्य पद्धतीने काम करत, एकाच्या मृत्यूस कारणीभूत (Death Caus) ठरलेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे.

 


 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर उड्डाणपुलाजवळ पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी गुरुवार दि.30 नोव्हेंबर 2023 दुपारच्या सुमारास ठेकेदार खड्ड्यात साचलेले पाणी काढण्यासाठी आला होता. त्या वेळी कामगारांना खड्ड्यात एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. वारजे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्या वेळी एक व्यक्ती खड्ड्यात मृतावस्थेत मिळून आला. तसेच दारूची बाटलीदेखील तेथे आढळून आली. अभिजित दिगंबर पांगुळ (Abhijeet Digambar Pangul) (वय. 32, रा. कर्वेनगर, पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन (Alcohol Addict) असून, तो फिरस्ता आहे. रात्री दारू पिल्यानंतर खड्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र ठेकेदाराने पुरेशा सुरक्षेची काळजी घेतली नव्हती (Contractor Not Done Safety Precautions). खड्ड्यात माणूस मरून पडल्याचे दिसल्यानंतर त्याने तेथे बॅरीकेट लावले आणि नंतर पोलिसांना पाचारण केले, अशा प्रकारचा आरोप नागरिकांनी केला आहे.


 

 

या ठिकाणी अनेक मद्यपी रात्रभर फिरत असतात. त्यामुळे काम सुरु झाल्यापासून अनेकांनी या खड्ड्यात रात्रीच्यावेळी कोणीतरी पडून मरेल, असे ठेकेदाराच्या कामगारांना सांगत, या ठिकाणी रात्री सुरक्षारक्षक (Security Guard) आणि धोका दर्शवणारे लाईट (Danger Lights) लावण्याची मागणी केली होती. मात्र ठेकेदाराने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष्य (Neglect) करत, काम सुरु ठेवले होते असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. मयत अभिजित पांगुळ याच्या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन (Postmortem) करण्यात आले असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती वारजे पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (PSI Narendra Mundhe) यांनी दिली.


 

 

वारजे हद्दीत आणखीन एक बेवारस बॉडी

वारजे हायवे चौकाजवळ (Warje Highway Chowk) असलेल्या अक्षय पॅलेस (Akshay Palace Warje) समोरील साईबाबा मंदिराशेजारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. शवविच्छेदनासाठी (Autopsy) त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याच्याही मृत्यूचे कारण स्पष्ट नसले तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण (Cause of Death) स्पष्ट होईल. त्याने अंगावर काळ्या रेषा असलेला लाल रंगाचा शर्ट परिधान केला आहे. याबाबत कोणाला काही अधिक माहिती असल्यास त्यांनी वारजे माळवाडी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन वारजे पोलिसांनी केले आहे.


 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share


 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.