Type Here to Get Search Results !

रस्त्यावर टाकलेले बांधकामाचे साहित्य आणि यंत्रांमुळे वाहतुकीला होतोय अडथळा; प्रशासनाचे दुर्लक्ष्य

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Traffic is obstructed by construction materials and machinery dumped on the road; Negligence of administration


 

Traffic is obstructed by construction materials and machinery dumped on the road; Negligence of administration

 

पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2024 (चेकमेट टाईम्स): कोणीही कुठेही बांधकाम (Construction) करत असताना, त्याचे बांधकाम साहित्य रस्त्यावर (Construction Material on Road) पडल्यास वाहतुकीला अडथळा होत असतो. अशावेळी महानगरपालिका प्रशासन असेल की पोलीस प्रशासन असेल, अशा नागरिकांना त्रास निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करताना दिसतात. मात्र वारजे (Warje) भागात सुरु असलेल्या एका बांधकामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असताना, याकडे मात्र या प्रशासकीय यंत्रणांकडून दुर्लक्ष्य होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या वाहतुकीला आणि नागरी जीवनाला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.

 


 

वारजे माळवाडी मधील राजयोग सोसायटी (Rajyog Society Warje) मध्ये टेलिफोन एक्सचेंज (Warje Telephone Exchange) जवळ रस्त्याच्या तोंडावरच एक बांधकाम सुरु आहे. या बांधकामाला पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) काही अटी शर्थींवर बांधकाम परवाना दिला आहे. मात्र त्या अटी शर्थींकडे सारासार दुर्लक्ष्य करून सदरील बांधकाम व्यावसायिक नागरिकांच्या अवागमन आणि जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मनमानी करत बांधकाम करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. सदरील बांधकाम सुरु करत असताना अगोदरचे जुने बांधकाम पाडल्यापासून तेथे फुटींगकरिता केलेल्या मोठ्या खड्ड्यांपर्यंत मोठ मोठ्या यंत्रांच्या केलेल्या वापरामुळे येथील अनेक घरांना हादरे बसत होते. त्याचबरोबर हे काम सुरु केल्यापासून नागरिकांना येण्याजाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. रस्त्यावरच टाकण्यात येत असलेली सिमेंटची पोती, वाळू आणि बांधकाम साहित्याच्या अडथळ्यातून वाहने हाकताना रस्त्यावर वाहने घसरत आहेत. त्यात येथे चौक असल्याने अपघाताची भीषणता वाढण्याची भिती येथील रहिवासी वर्तवत आहेत.


 

 

तर आता परीक्षा कालावधींमध्ये (Exam Period) सुरु असलेल्या बांधकामाच्या आवाजामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे चित्त एकाग्र होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांना परीक्षांना सामोरे जाताना, त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर इतर लहान मुलांना शाळेत जाताना आणि येताना त्याचबरोबर खेळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांना पडून दुखापती झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असून, त्यांच्यासह येथून चालणाऱ्या ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष्य देऊन, योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून समोर आली आहे.

 


 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.