Type Here to Get Search Results !

मुद्दामहून उखडला जातोय चांगला पदपथ?; शिवणे भागातील अजब प्रकार

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Deliberately uprooting a good footpath?; Strange type of sewing area

Deliberately uprooting a good footpath?; Strange type of sewing area

 

पुणे, दि. 28 फेब्रुवारी 2024 (चेकमेट टाईम्स): वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय (Warje Karvenagar Ward Office) हद्दीतील गणपती माथा (Ganapati Matha) ते शिंदे पूल (Shinde Pool Shivane) या रस्त्यावर एका मोठ्या व्यासाच्या पावसाळी अथवा मैलापाणी वाहिनीचे काम सुरु आहे. मात्र या कामात चांगला असलेला पदपथ (Padestrian Path) मुद्दामहून उखडून टाकला जात असल्याचा आरोप करत, नागरिकांनी नागरिकांचा चालण्याचा हक्क हिरावला जात असल्याने पुणे महानगरपालिका प्रशासनासह त्याकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. नागरिकांच्या कररुपी पैशांमधून विकासकामे करत असताना, दुसरी कामे का खराब करता आणि पुन्हा त्या कामांना वेगळा निधी खर्च करून एकप्रकारे नागरिकांच्या कररुपी पैशांवर पालिका अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराच्या संगनमताने दरोडा टाकला जात असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.

 


 

येथील धनगरबाबा बसथांबा ते शिंदे पूल दरम्यान या पावसाळी अथवा मैलापाणी वाहिनीचे काम सुरु असून, येथे पालिकेच्या नियमानुसार कोणत्याही नियम अटींचे पालन केले जात नसल्याचे दिसते. येथे नागरिकांच्या सुरक्षेकरिता कोणतेही कठडे उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी चालायला येणाऱ्या नागरिक, महिला, लहान मुले आणि शालेय विद्यार्थ्यांना अपघातांना सामोरे जावे लागते आहे. आपण छायाचित्रात पाहू शकता लहान मुलाला हाताला धरून जात असताना एकीकडे केलेली धोकादायक खोदाई आणि दुसऱ्या बाजूला वाहता रस्ता आहे. अशावेळी या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत नाही का? अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना याचे गांभीर्य नाही का? यांना एवढा मनमानी कारभार करण्यासाठी अभय कोण देतो? खराब केलेला पदपथ ठेकेदाराच्या खर्चातून दुरुस्त करून घेतला जाणार का? चांगला पदपथ उखडल्याप्रकरणी ठेकेदार आणि त्याकडे दुर्लक्ष्य केल्याप्रकरणी संबंधित अभियंत्यावर काय कारवाई केली जाणार? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे.


 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.