Type Here to Get Search Results !

पक्षफुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच येणार खडकवासला मतदार संघात; देवेंद्र फडणवीस देखील असणार उपस्थित

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Ajit Pawar will come to Khadakwasla constituency for the first time after party split; Devendra Fadnavis will also be present


 

Ajit Pawar will come to Khadakwasla constituency for the first time after party split; Devendra Fadnavis will also be present

 

पुणे, दि. 8 मार्च 2024 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) दोन गट झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha Constituency) येत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदार संघात (Khadakwasla Assembly Constituency) उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) पहिल्यांदाच येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) देखील असणार आहेत. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. वारजे माळवाडी (Warje Malwadi) मध्ये असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद बारटक्के रुग्णालयाच्या (PMC Pune Late Arvind Bartakke Hospital) ठिकाणी करण्यात येणार असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या (Multispeciality Hospital) भूमिपूजनासाठी हे दोघे येणार आहेत. रविवार दि.10 मार्च 2024 सकाळी 9 वाजता हे भूमिपूजन होणार असून, यावेळी बारामती लोकसभेच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी चेकमेट टाईम्सशी (Checkmate Times) बोलताना दिली.

 


 


पुणे महानगरपालिकेच्या वारजे माळवाडी प्रभागाअंतर्गत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलकरिता जागा आरक्षित (Reserved Land for Multispeciality Hospital) असून, या जागेचे क्षेत्रफळ अंदाजे 10 हजार 910 चौरस मीटर अर्थात 1 लाख 17 हजार 434 चौरस फुट एवढे आहे. सदर जागेवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात येणार आहे. डिझाईन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर (DBFOT - Design, Build, Finance, Operate and Transfer) तत्वावर सदर जागी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सुरू केल्यास याठिकाणी पुणे शहरातील गरीब व गरजू रूग्णांना अल्प दरामध्ये मल्टीस्पेशालिटी आरोग्य विषयक सेवासुविधा उपलब्ध होणार आहे. सदर ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करणेकामी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.

 


 


यानंतर सदर ठिकाणी 375 खाटांचे रुग्णालय कार्यान्वित होणार आहे. यापैकी 10 टक्के (37/38) खाटा पुर्णपणे मोफत, 6 टक्के (22/23) खाटा केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS - Central Government Health Scheme) दराने व इतर खाटा या खाजगी दरामध्ये पात्र निविदा धारकाडून डिझाईन – बील्ट – फायनान्स – ऑपरेट अँड ट्रान्सफर (DBFOT) तत्वावर घेण्यात येणार आहेत व या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री, कुशल व अकुशल मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी निविदा धारकावरच राहणार आहे. सदरची जागा ही पात्र निविदा धारकास 30 वर्षे कराराने चालवण्यास देण्यात येणार असून, मुदतीअंती सदरची मिळकत महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करून घेण्यात येणार आहे. सदरची निविदा हि प्लॅन, डिझाईन, बिल्ट, इक्विप, फायनान्स तत्वावर असून सदर प्रकल्पाअंतर्गत सुमारे 4 लाख चौरस फुटापेक्षा अधिक बांधकाम होऊ शकते. हॉस्पिटलचे सर्व इंटेरीअर, फर्निचर, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाकरीता आवश्यक सर्व वैदयकिय शस्त्र, उपकरणे व यंत्र सामुग्री यांचा अंतर्भाव करण्यात आला असून, सदर प्रकल्पाकरीता अंदाजीत खर्च 350 कोटी इतका अपेक्षित आहे. सदर रुग्णालयाचा प्रकल्प तीन वर्षामध्ये कार्यान्वित करण्यात येणार असून, त्याकरीता आवश्यक असणाऱ्या राज्य शासनाच्या परवानग्या व ना हरकत दाखले तयार असल्याची माहिती हाती आली आहे.

 


 


नागरिकांना सदर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अदययावत रेडिओलॉजी (Radiology), कार्डीओलॉजी (Cardiology), नेफ्रोलॉजी (Nephrology), युरॉलॉजी (Urology), सर्जरी (Surgery), पिडियाट्रीक (Pediatric), ऑर्थोपेडिक्स (Orthopedics), गायनॅकोलॉजी (Gynecology), एन.आय.सी.यु. (NICU) व आय.सी.यू. (ICU), अदययावत शस्त्रक्रिया गृहे (Advance Surgery Centers), मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर (Modular Operation Theater), सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या व निदान (Laboratory Tests and Diagnosis) आणि अत्याधुनिक उपचार सुविधा (Sophisticated Treatment Facilities) उपलब्ध होणार आहे. मात्र यातील विशेष भाग म्हणजे निविदेतील अटी शर्थी नुसार व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या परवानगीनुसार सदर रुग्णालय उभारणीकरीता कर्ज पुणे महानगरपालिकेच्या खात्यावर घेण्यात येणार आहे. मात्र असे असले तरी त्याची परतफेड पात्र निविदाधारकामार्फत करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प राबवताना व राबवल्यानंतर देखील पात्र निविदाधारकामार्फत पूर्ण कालावधीकरीता व पूर्ण कर्जाकरीता विमा उतरवण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे. तसेच या कामी पुणे महानगरपालिका, पात्र निविदाधारक व वित्तपुरवठा करणारी बँक यांच्यामध्ये त्रिपक्षीय करारनामा करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. याकरीता आवश्यक ते शुल्क पात्र निविदाधारकानी भरावयाचे आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेस कोणतीही आर्थिक तोशिष लागणार नाही, याची काळजी घेण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 


 


भूमिपूजन होत असलेल्या या रुग्णालयाची ठळक वैशिष्ट्ये

 

1) जगामध्ये भारतात प्रथमच जर्मनी (Germany) आणि नेदरलँड (Netherlands) सारख्या युरोपियन देशांनी (European Countries) महापालिकेसोबत केलेला हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. (First Time in INDIA)

2) रूरल एन्हान्सर्स (Rural Enhancers) कंपनीमार्फत 43 दशलक्ष युरो चा वित्तीय पुरवठा.

3) भारतात प्रथमच संपूर्ण प्रोजेक्टचा नेदरलँड शासनातर्फे संपूर्ण 99 टक्के राजकिय व व्यावसायिक रिस्क कव्हरेज विमा. (Political and Commercial Risk Coverage Insurance)

4) आंतरराष्ट्रीय हॉस्पिटल संस्थेतर्फे संपूर्ण हॉस्पिटलचे व्यवस्थापन. (International Hospital Organization Management)

5) गरजूंसाठी आवश्यक असणाऱ्या रुग्ण सुविधा मोफत. (Free Essential Facilities for Needy Patient)

6) अत्याधुनिक असे 60 हजार चौरस फुटाचे हीलिंग गार्डन (Healing Garden) व आंतरराष्ट्रीय दर्जाचा मानसिक आरोग्य विभाग (Department of Mental Health of International Standard) असणार.

7) रुग्णालयाच्या हाती आलेल्या पहिल्या आराखड्यानुसार टेरेसवर हेलिकॉप्टर (Terrace Helipad) उतरण्यासाठी जागा असणार.

8) पुण्यातील हे पहिलेच पंचतारांकित रुग्णालय असण्याची शक्यता. (First 5 Star Hospital in Pune)

 


PMC Pune Late Arvind Bartakke Hospital / Warje Malwadi Multispeciality Hospital

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

PMC Pune Late Arvind Bartakke Hospital / Warje Malwadi Multispeciality Hospital


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.