Type Here to Get Search Results !

वारजे मधून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालकाने लुटले; साथीदारांसह रिक्षाचालक ताब्यात

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha

A rickshaw driver robbed a passenger going from Warje to Chandni Chowk; The rickshaw driver and his accomplices were arrested



पुणे, दि. १९ मे २०२५ (Checkmate Times): वारजे पुलाखालून बावधनकडे जाण्यासाठी थांबलेल्या प्रवाशाला रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी शिताफीने रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. मात्र यामुळे वारजे पुलाखालून चारही दिशांना चालू असलेल्या अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. तर हि अवैद्य प्रवासी वाहतूक कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहे असाही सवाल उपस्थित होतो आहे.

सदरील घटना सोमवार दि.१२ मे २०२५ सायंकाळी घडली. विशेष म्हणजे या दिवशी जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची जयंती होती आणि त्याच सायंकाळी हि घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेतील पिडीत कामावरून घरी जाण्यासाठी वारजे पुलाखालून चांदणी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या बसथांब्यावर उभा होता. त्यावेळी एक रिक्षा त्याचे शेजारून जाताना त्याचेजवळ थांबली. तेव्हा रिक्षाचालकाने त्यास कोठे जायचे आहे असे विचारले असता त्याने बावधन येथे जायचे असल्याबाबत सांगितले. त्यावर रिक्षाचालकाने त्याला रिक्षामध्ये बसवले. रिक्षाचालकाने रिक्षा वारजे पुलाकडून बावधनकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने घेवून जात डुक्करखिंडच्या जवळपास गेल्यावर लघुशंकेच्या बहाण्याने रिक्षा थांबवून खाली उतरला व मजुर इसमाचे शेजारी बसलेल्या इसमास खाली बोलावून घेतले. त्यानंतर रिक्षाचालकाने नियोजनबध्द पध्दतीने रिक्षामध्ये बसलेल्या व्यक्तीस दोन्ही बाजूने घेरून त्याला दमदाटी करत, त्याचे खिशातून २ हजार रुपये रोख आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून काढून घेतला. त्यावेळी सदरील व्यक्तीने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्या दोघांनी त्याला दमदाटी करत, मारहाण करण्याची धमकी दिली. त्याचबरोबर “याबाबत पोलीसांत तक्रार केली तर जिवे मारून टाकेन” अशी धमकी देवून दोघेही रिक्षासह तेथून निघून पळून गेले.

मनात घरी जाण्याची आस आणि नियोजन असताना अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सदरील व्यक्तीस धक्का बसला. यामुळे त्याला रिक्षाचा नंबर देखील पाहता आला नव्हता. त्यातच रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने दिलेल्या धमकीमुळे तो घाबरून पोलीसांकडे गेला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचे कामाचे ठिकाणी गेल्यानंतर त्याने सदरचा प्रकार त्याचे मालकास सांगितला. यावेळी मालकाने त्यास धीर देत, दोघांनी वारजे पोलीसात धाव घेत, घडलेली घटना कथन केली. हि घटना म्हणजे जबरी दरोडा असल्याने पोलिसांनी तत्काळ दोन वेगवेगळी पथके तयार करत तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळ आणि मार्गावरील सीसीटीव्ही तपासणी करण्यात आले आणि समोर आलेल्या वर्णनाची रिक्षा शोधताना, सदर पथकांनी वेगवेगळ्या रिक्षा स्टॉपला सदर रिक्षाचा शोध घेण्यासाठी अनेक रिक्षाचालकांकडे चौकशी केली. परंतू काहीएक उपयुक्त माहिती मिळाली नाही. रिक्षाचा शोध सुरुच असताना काहीवेळाने एका रिक्षाचालकाने पोलीस अंमलदार विजय भुरुक यांना फोनव्दारे सदर वर्णनाची एक रिक्षा वारजे जकात नाक्यावरून कर्वेनगर परिसरात गेली असल्याचे सांगितले.

याबाबत माहिती मिळताच परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त संभाजी कदम, कोथरुड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली, वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख यांचे देखरेखीत वारजे चौकीचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रणजित मोहिते व पोलीस अंमलदार विजय भुरुक, विक्रम खिलारी व संभाजी दराडे यांचे एक पथक कर्वेनगर परिसरात रवाना केले. सदर पथकाने कर्वेनगरचा सर्व परिसर पिंजून का,ढत सदर वर्णनाची रिक्षा ताब्यात घेवून. त्यातील चालक आदित्य राम वाघमारे (वय २३ वर्षे, रा. करीश्मा चौक, कोथरूड, पुणे) याचेकडे विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे कसून तपास केल्यावर, त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याचा साथीदार सत्येंद्र मिठाईलाल जयस्वाल (वय २० वर्षे, रा. एकता कॉलनी, वारजे, पुणे) याचे नावही त्याने सांगितले. यानंतर सदर पथकाने काहीवेळात त्याचे साथीदारास देखील ताब्यात घेतले. यानंतर राहुल गोविंद भोई (वय ३३ वर्षे, रा. बावधन, पुणे) यांच्या तक्रारीवरून दोघानाही अटक करून, गुन्ह्यातील पुर्ण मुद्येमाल हस्तगत करण्यात वारजे पोलिसांना यश आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रणजित मोहिते पुढील तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.