Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये अवकाळी पावसाचा बळी, १० वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू?; गाडीवर झाड पडून नुकसान

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha

 

Unseasonal rains in Warje; Ten-year-old boy dies of electric shock, tree also falls


 

पुणे, दि. २१ मे २०२५ (Checkmate Times): वारजे माळवाडी मध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वारजे रामनगर परिसरात एका दहा वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. तर वारजे माळवाडी मध्ये एक आंब्याचे झाड मोटारीवर कोसळून मोटारीचे नुकसान झाले आहे. सर्वच रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे पुणे महानगरपालिका असेल कि महावितरण यांच्या पावसाळापूर्व कामांची जुमलेबाजी उघड पडली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

 

यामध्ये वारजे रामनगर मधील मारुती मंदिराच्या मागे असलेल्या एका विजेच्या खांबाजवळून जात असलेल्या दहा वर्षांच्या मयंक उर्फ दादू प्रदीप अडागळे याला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. घटना घडल्याबाबत माहिती मिळताच महावितरण आणि वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयंकला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या विजेच्या खांबा बाबत अनेकदा तक्रारी करून देखील त्याची दुरुस्ती केली जात नव्हती असा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वी देखील वारजे माळवाडी मध्ये पथदिव्याच्या खांबाचा धक्का लागून एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा घटना वारंवार घडून देखील महावितरण आणि महापालिका याकडे गांभीर्याने का बघत नाही असा सवाल उपस्थित हतो आहे. अनेक पथदिवे आणि विजेच्या खांबाना लोखंडी फ्रेमचे अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. त्यामुळे खांबाना लावलेल्या वायर कुरतडल्या जाऊन, पावसाळ्याच्या काळात त्यातून विजेचा प्रवाह प्रवाहित होऊन, खांबाला स्पर्श करणाऱ्यांना विजेचा धक्का बसू शकतो याबाबत महापालिका आणि महावितरणला पूर्ण कल्पना आहे. मात्र असे असताना देखील महापालिकेचा विद्युत विभाग आणि आकाशचिन्ह विभाग, त्याचबरोबर महावितरणचे अधिकारी कर्मचारी त्याकडे का दुर्लक्ष्य करतात? त्यांना त्या कामाचा पगार मिळत नाही का? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

 

तर दुसऱ्या घटनेत वारजे माळवाडी मधील यशोदीप चौकाजवळ एका चारचाकी मोटारीवर आंब्याचे झाड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये टाटा टीगोर क्र. एमएच १४ जीएस ५१९७ चे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही मनुष्यहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. याबाबत माहिती मिळताच माजी नगरसेवक सचिन दोडके यांचे बंधू असलेल्या संजय उर्फ बाबू दोडके यांनी अग्निशमन दलाशी संपर्क करून, त्यांना तत्काळ घटनास्थळी येण्याबाबत विनंती केली. यानंतर वारजे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत, झाड कापून बाजूला केले. त्याचबरोबर वारजे हायवे वरील चर्च जवळ देखील एक झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र जवळच अग्निशमन केंद्र असल्याने अग्निशमन जवानांनी तत्काळ झाड कापून बाजूला केले. मात्र तेवढा वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.