Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today, khadakwasla vidhan sabha, kothrud vidhan sabha, hadapsar vidhan sabha, parvati vidhan sabha, vadgaon sheri vidhan sabha, shivaji nagar vidhan sabha, kasba vidhan sabha, pune vidhan sabha
पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याची केली सूचना
पुणे, दि. २४
मे २०२५ (Checkmate Times): भारतीय हवामान खात्याने
यंदाच्या वर्षी नेहमीपेक्षा अधिक अर्थात ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज
वर्तवला आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुभव पाहता; ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाची हद्द
असेल कि कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयासह संपूर्ण पुणे शहरात कुठेही पाणी
साचणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूड विधानसभा मतदार संघाचे
आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी आज
घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, दिनेश गोमारे, आपत्ती व्यवस्थापनचे उपायुक्त गणेश सोनुने, आशा राऊत, कर विभागाचे अविनाश संकपाळ, महापालिका सहायक आयुक्त दीपक राऊत, विजय नायकल यांच्या सह महापालिकेचे इतर अधिकारी, तीनही प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी, भाजप कोथरूड मध्य
मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्या सह माजी नगरसेवक राजाभाऊ
बराटे, दिलीप वेडे पाटील, दीपक पोटे, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, जयंत
भावे, वृषाली चौधरी, सुशील मेंगडे, अमोल बालवडकर आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. यांनी पुणे शहरासह
कोथरूड मतदारसंघातील पावसाळी पूर्व कामांची माहिती चंद्रकांत पाटील यांना दिली.
यात प्रामुख्याने पाणी वाहून नेणाऱ्या शहरातील २०१ मुख्य नाले असून; त्यापैकी १५ नाले हे
कोथरुड मतदारसंघात असल्याची माहिती दिली. ह्या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली
असून उर्वरित काम जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर
नामदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुणे शहरासह मतदारसंघातील नाले सफाईची कामे जलदगतीने
पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.
तसेच मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावेत. महापालिकेच्या
माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांचा पाहणी अहवाल २४ तासांत सादर करावा, अशा सूचना कर्वेनगर,
कोथरुड मधील सर्व माजी नगरसेवकांना केल्या. त्याचबरोबर पावसामुळे निर्माण होणाऱ्या
समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना पाटील
यांनी यावेळी दिली.
यावेळी क्षेत्रीय कार्यालयांना कोणतेही अधिकार नसल्याने, दरवेळी अधिकाऱ्यांना
कामांसाठी मुख्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेक नागरी समस्या दीर्घकाळ रेंगाळतात, असा मुद्दा बैठकीत मांडला
गेला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न सुटला पाहिजे; अशी अपेक्षा
अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. यांनी
अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन क्षेत्रीय कार्यालयांना निधी उपलब्ध करून देण्यास
सकारात्मकता दर्शवली. तसेच, पावसाळ्यात अनेक भागात दुषित पाणी पुरवठ्याची समस्या मांडण्यात आली. ही
गंभीर बाब असल्याने त्याचेही नियोजन करण्याची सूचना पाटील यांनी यावेळी केली.
दरम्यान, या बैठकीत वीजपुरवठा
खंडित होणे, झाडांच्या फांद्या
वेळेत काढणे यांसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
क्षेत्रीय कार्यालयांना पूर्वीप्रमाणे आपातकालीन २५ लाखांचा निधी द्या; राजाभाऊ बराटे यांची मागणी
पावसाळी अथवा इतर आपतकालीन परिस्थितीमध्ये क्षेत्रीय कार्यालयांकडे स्वत:चा २५ लाखांचा निधी उपलब्ध होता. कोविड नंतर तो देण्यात येत नाही. त्यामुळे हद्दीतील कोणत्याही कामांसाठी अधिकाऱ्यांना मुख्य खात्यावर विसंबून रहावे लागते. याची परिणीती कोणत्याही समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्यात वेळ जात असल्याने तो निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी यावेळी केली.
पावसाळी वाहिन्या, नाल्यांची सफाई झालेली नाही; मंजुश्री खर्डेकर यांची तक्रार
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दील अनेक पावसाळी वाहिन्या आणि नाल्यांची परिपूर्ण सफाई झालेली नाही. याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील ते ऐकत नाहीत. यामुळे रस्त्यावर पाणी वाहते आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी यावेळी नमूद केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

